‘...तर कोर्टात खेचेन’, अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस,सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

Last Updated:

शरद पवारांना तुम्ही नोटीस पाठवली, शरद पवार ईडीच्या नोटीसला देखील घाबरत नाही तुमच्या नोटीसला काय घाबरणार, असा पलटवार देखील सुप्रिया सुळे यांनी नोटीसीवर दिला आहे.

अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस
अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस
पुणे : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना टार्गेट करणारे अजित पवार विधानसभेला मात्र त्यांच्यावर जपून टिका करतायत. असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदाराने शरद पवारांना कोर्टात खेचण्याची नोटीस दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. नेमकं त्या काय म्हणाल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सभा पार पडली.या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मागच्या वर्षी आम्ही वेगळ्या व्यक्तीसाठी तिकीट मागितलं, ज्यांच्या एबी फॉर्म वर शरद पवारांची सही आहे. त्या व्यक्तीने काय केलं तुम्हाला माहिती आहे. त्या व्यक्तीने पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे की पोर्शें अपघात प्रकरणी माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचेन,असा खळबळजनक गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केल आहे.
advertisement
तसेच शरद पवारांना तुम्ही नोटीस पाठवली, शरद पवार ईडीच्या नोटीसला देखील घाबरत नाही तुमच्या नोटीसला काय घाबरणार, असा पलटवार देखील सुप्रिया सुळे यांनी नोटीसीवर दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी स्वतः नोटीस पाहिली नाही आहे, पण मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे की जर तुम्ही पोर्शे केसमध्ये माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचू, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
advertisement
तसेच हा देश अदृश्य शक्तीने चालणार नाही, संविधानाने चालणारा आहे.त्यामुळे पौर्शे चालकाकडून हत्या झाली असेल तर आम्ही बोलणारच.स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते हे तुम्ही रिपोर्ट केले आहे. आणि पवार साहेब जर खरं बोलले तर त्यांना वकिलातून नोटीस पाठवणार, सत्यमेव जयते आम्ही तयार आहोत, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
‘...तर कोर्टात खेचेन’, अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस,सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement