Beed: सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला, डॉक्टरच्या वडिलांशी संवाद, कुटुंबाला शब्द दिला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबियांशी संवाद साधला. प्रकरणातील कायदेशीर बारकावे समजून घेतले.
बीड : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील युवती डॉक्टर मृत्यू प्रकरण उलचून धरून व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारलेल्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची बीडला जाऊन भेट घेतली. पीडित कुटुंबियांशी संवाद साधून न्याय मिळविण्याच्या लढ्यात शेवटपर्यंत सहभागी असेन, असा शब्द त्यांनी दिला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही दूरध्वनीवरून संपर्क केला. उद्धव ठाकरे यांनही पीडित कुटुंबाची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
शवविच्छेदन अहवालामध्ये काही उणीवा होत्या, याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शवविच्छेदनासाठी भावाला उपस्थित राहू दिले नाही. इनकॅमेरा शवविच्छेदन केले गेले पाहिजे अशी मागणी होती. ऊसतोड मजुरांवर दोन दोन मिनिटाला FIR झाले. मात्र युवती डॉक्टरच्या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास आठ तास एवढा वेळ लागतो. संशयास्पद पद्धतीने या गोष्टी केल्या गेल्या. प्रशासनाने सगळ्या गोष्टी घाईघाईत केल्या यावर अनेकांना शंका आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
advertisement
कायदेशीर लढ्यात साथ देणार, कुटुंबाला शब्द
उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबियांशी संवाद साधला. प्रकरणातील कायदेशीर बारकावे समजून घेतले. कुटुंबाच्या वतीने वकील दिलेला असेल तरी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील उपलब्ध करून देण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाला दिलेला आहे. तसेच काहीही गरज लागली तर मदत करण्याचा शब्दही उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांना दिला.
advertisement
रुपाली चाकणकर यांच्यावर अजित पवार कारवाई करणार
राज्याचा महिला आयोग युवती डॉक्टरच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करतोय. फलटणमध्ये पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच तसा प्रयत्न केला, असा आरोप मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी केला. पीडितेच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी चाकणकर यांच्या मताशी आम्ही सहमत नसल्याचे सांगत कारवाई करू असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे विश्वास ठेवू, असे अंधारे म्हणाल्या.
advertisement
३ तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर बसणार
ऊसतोड कामगाराचे लेकरू कर्तृत्ववान होते. सरकार आणि व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे. आम्ही सरकारला आवश्यक कारवाई करण्यासाठी २ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. ३ तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर बसू, असा इशारा अंधारे यांनी दिला.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
October 30, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला, डॉक्टरच्या वडिलांशी संवाद, कुटुंबाला शब्द दिला


