नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशीच तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली असून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने परिपत्रक काढून बदलीचा आदेश जारी केला आहे.
अनिस शेख, न्यूज १८ लोकमत, मावळ : राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुकांची घोषणा झालेली असतानाच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तळेगावचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली झालेली आहे. त्यांच्या रिक्त जागी पुणे महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर हे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत
या बदलीबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने परिपत्रक काढून बदलीचा आदेश जारी केला आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांच्या सहीने संबंधित बदलीचे परिपत्रक जारी झाले आहे.
प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४१५) मधील तरतुदीनुसार, मुख्याधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
-छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५
-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
-मतमोजणीचा दिवस-३ डिसेंबर २०२५
view commentsLocation :
Talegaon Dabhade,Pune,Maharashtra
First Published :
November 04, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशीच तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली


