मतदारयाद्या फाडल्या, अधिकाऱ्यांवर कागदं उधळली, मनसे नेते अविनाश जाधव संतापले, ठाण्यात राडा
- Published by:Akshay Adhav
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
मतदारयाद्यातील घोळ दाखवूनही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने अविनाश जाधव यांनी मतदार याद्या फाडून कागदे अधिकाऱ्यांवर उधळली.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मतदार यादीच्या कथित घोळावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून यावर पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती करीत मनसे नेते अविनाश जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, जीबी गोदापुरे यांना केली. मात्र अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने अविनाश जाधव यांनी मतदार याद्या फाडून कागदे अधिकाऱ्यांवर उधळली.
ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे. जवळजवळ प्रत्येक प्रभागांमध्ये बाहेरची नावे घुसविण्यात आलेली आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाचमधली नावे आलेली आहेत, पाचव्या प्रभागातली नाव तिकडे आलेली आहेत. अशा प्रकारे जर मतदार याद्या असतील तर निवडणुका निष्पक्ष कशा होतील? असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला.
बोगस नावे कुणी घुसवली?
advertisement
अनेक लोक ज्यांनी विधानसभेला मतदान केले पण त्यांची नावे आता महापालिकेला नाही. अनेक नावे अशी आहेत ज्यांची अचानकपणे वॉर्डात एन्ट्री झाली आहे. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना काही उदाहरणे दाखवून दिली. पण त्यांच्याकडे काहीच उत्तरे नव्हती. ठाण्यात १६ लाख ४९ हजार मतदार होते, आता साडेचार लाख मतदान वाढलेले आहेत, यांची नावे कुणी घुसवली असा प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारला. तसेच मतदार याद्या जोपर्यंत साफ होत नाहीत तोवर निवडणुका होऊ नयेत असे आमचे म्हणणे असल्याचे जाधव म्हणाले.
advertisement
काम करणारे हरतात, घरात बसणारे जिंकतात, ही कुठली पद्धत
जिंकून यायला आम्हाला आठ नऊ हजार मतदान लागते. परंतु काही लोक बाहेरचे बोगस मतदान घुसवतात आणि जिंकून येतात. अनेक वर्षांपासून जातीने काम करणारे लोक त्यामुळे पराभूत होतात.
कुणाची तरी बायको, मुलगा जो कधीही काम करत नाही, असे लोक घरात बसून निवडून येतात. त्यामुळे चिन्ह पाहू नका. काम करणाऱ्यांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचं वाटोळे होईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 6:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदारयाद्या फाडल्या, अधिकाऱ्यांवर कागदं उधळली, मनसे नेते अविनाश जाधव संतापले, ठाण्यात राडा


