Thane News: 8 महिन्यांपूर्वी लग्न, तो कंटेनर आणि मृत्यू.... ठाण्यातल्या आरतीचा दुर्दैवी अंत; यात चुक कुणाची?

Last Updated:

सोमवारी रात्री उशिरा ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुलावरून जात असताना एका तरूणीचा दुचाकी वरून अपघात झाला आहे. ती रस्त्यावरील खड्ड्यामध्ये तिची दुचाकी आदळली आणि ती खाली पडली. तेवढ्यामध्ये पाठीमागून येणाऱ्या कंटेनरला तिची धडक बसली आणि त्या धडकेमध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
ठाणे शहरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका कायम सुरूच आहे. आता अशातच आणखी एक घटना ठाण्याच्या घोडबंदर परिसरामध्ये घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुलावरून जात असताना एका तरूणीचा दुचाकी वरून अपघात झाला आहे. ती रस्त्यावरील खड्ड्यामध्ये तिची दुचाकी आदळली आणि ती खाली पडली. तेवढ्यामध्ये पाठीमागून येणाऱ्या कंटेनरला तिची धडक बसली आणि त्या धडकेमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरूणीचं नाव आरती मिश्रा असं आहे.
काही महिन्यांपूर्वीच प्रियकरासोबत आरतीने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या काही महिन्यानंतरच आरतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिच्या घरच्यांवर मोठा आघात झाला आहे. लग्नानंतर आरती तिच्या पतीसोबत ठाणे पश्चिमेतील ओवळा परिसरामध्ये राहत होती. सोमवारी रात्री घरी जात असताना आरतीचा वाघबीळ उड्डाणपुलावर खड्ड्यांनी घात केला आणि तिच्या दुचाकीचा नियंत्रण सुटून ती खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने तिला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कंटेनरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला.
advertisement
रोज रात्रीपर्यंत आरती घरी पोहोचायची, पण सोमवारी बराच वेळ झाला तरीही ती घरी न पोहोचल्या मुळे तिच्या सासरकडील लोकं तिची वाट पाहत होते. फार वेळ झाला तरीही आरती घरी न आल्यामुळे सर्वच बेचैन झाले. शेवटी रात्री उशिरा आरतीच्या निधनाची बातमी तिच्या घरच्यांच्या कानावर पडली आणि सर्वांनी एकच टाहो फोडला. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन जगणार्‍या आरतीने तिच्या पतीसोबत खूप सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. परंतू आता सर्व माती मोल ठरली आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News: 8 महिन्यांपूर्वी लग्न, तो कंटेनर आणि मृत्यू.... ठाण्यातल्या आरतीचा दुर्दैवी अंत; यात चुक कुणाची?
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement