Devendra Fadnavis in Bhivandi : 'मोदींच्या नेतृत्वात पांडव तर समोर कौरवांमध्ये..' शेवटच्या सभेत फडणवीस काय म्हणाले?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Devendra Fadnavis in Bhivandi : भिवंडीत आज महायुतीची सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीसांना यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
भिवंडी : राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. आज भिवंडीमध्ये महायुतीची सभा झाली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाच पांडव आहेत, तर दुसरीकडे कौरव सेना असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. पाच वर्षात पाच पंतप्रधान करणार असं विरोधक सांगत आहे, हा काही संगीत खुर्चीचा खेळ आहे का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
ही निवडणूक म्हणजे पांडव आणि कौरवांची लढाई : फडणवीस
महाराष्ट्रामधील महायुतीची शेवटची सभा मी भिवंडीमध्ये घेत आहे. मार्च महिन्यामधील माझी ही 115 वी सभा आहे. आणि मी निश्चय केला होता की शेवटची सभा ही भिवंडीमध्ये घेणार आहे. कारण या भिवंडीमध्ये राष्ट्रभक्त, देशभक्त लोक राहतात. माझा विश्वास आहे की कपिल पाटील हे तिसऱ्यांदा भिवंडी लोकसभेमध्ये निवडून येऊन दिल्लीमधील संसद भवनमध्ये बसणार आहेत. ही निवडणूक कोणत्या एका व्यक्तीची नसून पूर्ण देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कौरव आणि पांडवांसारखे युद्ध होणार आहे. एका बाजूने कौरवांची सेना आणि एका बाजूने पांडवांची सेना अशी या निवडणुकीची लढाई होणार आहे.
advertisement
पंतप्रधान पद काय संगीत खुर्ची आहे का? फडणवीस
एका बाजूने विकासपुरुष नरेंद्र मोदी हे पांडवांच्या सेनेचे नेतृत्व करणार असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार, मनसेचे राज ठाकरे, आठवल्यांचे रिपाई यासारखे अनेक पक्ष एकत्र येऊन पांडवांची सेना बनलेली आहे. तर दुसऱ्या बाजूने कौरवांच्या सेनेत कोण आहेत? राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि 24 पार्ट्या एकत्र येऊन इंडिया आघाडीचे गांधन बांधत आहेत. मी त्यांना विचारले की आमचा विजय झाल्यावर आमचे पंतप्रधान हे मोदी असणार आहेत. आणि जर तुमचा चुकून विजय झाला तर तुमच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल. तुम्हाला माहित आहे की सकाळी 9 वाजता टीव्हीवर एक पोपटलाल लाईव्ह येतात. त्यांना विचारला की तुमच्याजवळ पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे तर त्यांनी सांगितले की आमच्याजवळ पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे आहेत. हा काय संगीत खुर्चीचा खेळ आहे का? असा टोला फडणवीस यांनी लगावला.
advertisement
हा काही तुमच्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख निवडायचा नाही किंवा तुमच्या कंपनीचा एक प्रमुख निवडायचा नाही तर हा देशाचा प्रमुख पंतप्रधान निवडायची निवडणूक आहे. आमच्याजवळ नरेंद्र मोदींच्या रूपाने सर्वसामान्य माणसाच्या गरजा पाहून त्या सोडवणारा चेहरा आहे. आमचे गटबंधन चालू असलेल्या मेट्रो सारखे आहे आणि त्या मेट्रोचे इंजन हे मोदीजींच्या सारखे नेतृत्व करत आहे. आणि त्या मेट्रोला दिन, दुबले, गरीब, पीडित, अल्पसंख्यांक, ओबीसी, यासारखे अनेक बोगीचे डब्बे जोडलेले आहेत. या ट्रेनमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींशी ट्रेन पुढे जात आहे आणि सबका साथ सबका विकास करत आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
May 18, 2024 8:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Devendra Fadnavis in Bhivandi : 'मोदींच्या नेतृत्वात पांडव तर समोर कौरवांमध्ये..' शेवटच्या सभेत फडणवीस काय म्हणाले?


