भिवंडीचा अन्सारी निघाला क्रूर राक्षस, पोलिसांच्या तावडीतून पळताच पुन्हा केला भयानक कांड!

Last Updated:

Crime in Bhiwandi: ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या तावडीतून पळ काढलेल्या नराधम आरोपीनं पुन्हा त्याच प्रकारचा विकृत गुन्हा केला आहे.

News18
News18
नरेंद्र पाटील, प्रतिनिधी भिवंडी: ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका नराधमाने सात वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीनं याआधी देखील अशाच प्रकारचा गुन्हा केला होता. संबंधित प्रकरणात त्याला अटक झाली होती. तुरुंगवारी देखील घडली होती. पण पोलिसांच्या तावडीतून फरार होताच आरोपीनं पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला आहे. या नव्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक केली आहे.
सलामत अन्सारी असं नराधमाचं नाव आहे. त्याने भिवंडी परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. आरोपीनं चिमुकलीच्या अब्रूचे लचके तोडल्यानंतर तिची अमानुष हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अन्सारीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी सलामत अन्सारीने अशाच प्रकारचं दुष्कृत्य केलं होतं. सप्टेंबर 2023 मध्ये त्याने भिवंडी शहरातील फेणेगाव येथील एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. यानंतर तो पळून गेला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करत अथक प्रयत्नाने त्याला बिहारमधून अटक केली होती.
advertisement
दरम्यान, ऑगस्ट 2025 मध्ये त्याला भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी हजर केलं असता, सलामत अन्सारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतर त्याने अवघ्या काही दिवसांत पुन्हा त्याच प्रकारचा विकृत गुन्हा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली आहे. त्याने यापूर्वी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र अन्सारीने अशाप्रकारे सात वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय. अन्सारीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
भिवंडीचा अन्सारी निघाला क्रूर राक्षस, पोलिसांच्या तावडीतून पळताच पुन्हा केला भयानक कांड!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement