advertisement

UPSC च्या विद्यार्थिनीवर कॉस्टिक सोडा टाकला अन्.. कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Kalyan Crime : कल्याणमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनीला लुटल्याचा प्रकार घडला आहे.

News18
News18
कल्याण : लोकसभा निवडणूक काळात सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसवा आयोगच्या परीक्षेचा (UPSC Exam) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनीच्या लुटल्याचा प्रकार घडला. तरुणीच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकून तिला लुटण्यात आले. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशन जवळील जे प्रभाग परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
अंजली पांडे, असं या पीडित तरुणीचं नाव आहे. ती युपीएससीचा अभ्यास करते. अंजली यूपीएससीच्या क्लासवरून कल्याण पुर्व येथे येत होती. त्याचवेळी जे प्रभाग परिसरात काही अज्ञातांनी तिच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचबरोबर काही वेळ तिला दिसेनासे झाले. याचाच अज्ञातांनी फायदा घेत तरुणीकडे असलेला बॅगेतील लॅपटॉप चोरी करून ते पसार झाले. दरम्यान थोड्यावेळाने या तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दिली. सध्या तिला वैद्यकीय चाचणीसाठी कल्याणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान हे चोरटे कोण होते? याचा पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र रहदारीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
UPSC च्या विद्यार्थिनीवर कॉस्टिक सोडा टाकला अन्.. कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement