धक्कादायक! कुत्र्यावरून वाद, कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणांच्या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Kalyan News: कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीतून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तिघा मद्यधुंद तरुणांनी डिलिव्हरी बॉयला मारहाण केलीये.
कल्याण: कल्याण पूर्वेकडील एका हाय-प्रोफाइल सोसायटीत तिघा मद्यधुंद तरुणांनी डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. रितेश अंपायर या सोसायटीत पार्सल देण्यासाठी आलेल्या इंद्रजितसिंह संधू यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. बचावासाठी कुत्र्यावर लाकूड फेकल्याच्या रागातून तिघांनी संधू यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
डिलिव्हरी बॉय इंद्रजित सिंह संधू हे मंगळवारी रात्री पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी रितेश अंपायर सोसायटीत आले होते. तेव्हा सोसायटीतील एका कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. स्वत:च्या बचावासाठी संधू यांनी लाकूड उचलून कुत्र्याला हुसकावले. मात्र, याच कारणावरून तिथे उपस्थित मद्यधुंद तरुण संतापले आणि त्यांनी संधू यांना मारहाण केली. यामध्ये संधू यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून दात पडले आहेत.
advertisement
सीसीटीव्हीत घटना कैद
सोसायटीतील मारहाणीची ही घटना इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, कोळसेवाडी पोलिसांनी केवळ एका आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नागरिकांतून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय. पीडित संधू यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केलीये.
advertisement
मद्यधुंद तरुणांची दहशत
view commentsमिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील हे तीन तरुण डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयशी मुद्दामहून वाद घालतात. त्यांना त्रास देतात आणि मारहाण करतात. दारूच्या नशेत राहणाऱ्या या तरुणांची दहशत असून पोलिसांनी ती मोडीत काढावी, अशी मागणी होते आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 16, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
धक्कादायक! कुत्र्यावरून वाद, कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणांच्या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी