Bhiwandi Crime : शय्यासोबत करताना महिलेसोबत वाजलं; तरुणाकडून भयानक शिक्षा, भिवंडीतील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Bhiwandi Crime : भिवंडीत देह व्यापार करणाऱ्या महिलेची हत्या करुन गावी पळून जाणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमध्ये अटक.
भिवंडी, 27 नोव्हेंबर (सुनिल घरत, प्रतिनिधी) : भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत सेक्स वर्करची हत्या झाली होती. या प्रकरणी आरोपीच्या ओडिसा राज्यात पळून जात असताना पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकातून मुसक्या आवळल्या. घटनेनंतर अवघ्या 48 तासात आरोपीला अटक करण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक (वय 24 रा. बालासोर ओडिसा) असे अटक आरोपीचे नाव आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
21 नोव्हेंबर रोजी रात्री देह व्यापार करणाऱ्या सेक्स वर्कर महिलेसोबत शय्यासोबत करण्यासाठी आलेल्या तरुणाचे महिलेसोबत भांडण झाले असता वाद विकोपाला जाऊन तरुणाने खोलीतील दगडी पाटा वरवंटा महिलेच्या डोक्यात मारून तिची हत्या केली होती. घटनेनंतर भिवंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपासाची चक्र फिरवली. पोलीस पथकासह दाखल झालेले भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी त्याठिकाणी हत्या करणाऱ्या युवकासोबत आलेल्या मित्राला ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली. त्यावर हत्या करणाऱ्या युवकाचा फोटो व वर्णन पोलिसांना मिळाले.
advertisement
वाचा - लग्नानंतर पहिल्या रात्री ओरडू लागला नवरदेव; खोलीचा दरवाजा उघडताच हादरले कुटुंबीय
आरोपी आपल्या मूळगावी पळून जाण्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस शिपाई नितीन नंदीवाले, संजय भोसले हे तातडीने त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. आरोपीस आपल्या मूळगावी जाण्यासाठी पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात रेल्वे बदली करावी लागते. त्यामुळे आरोपी हा गीतांजली एक्स्प्रेस मधून खरगपूर रेल्वे स्थानकात उतरताच पोलीस पथकाने आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक यास ताब्यात घेतले व त्याकडे चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून भिवंडीत आणून न्यायालयात हजर केले असता 1 डिसेंबरपर्यंत आरोपीस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 27, 2023 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi Crime : शय्यासोबत करताना महिलेसोबत वाजलं; तरुणाकडून भयानक शिक्षा, भिवंडीतील घटना