Video : झोपडीत राहणाऱ्या मुलाची भरारी, रॅप साँगमधून करतोय समाजात जागृती

Last Updated:

विठ्ठलवाडीतला तरुण समाजातल्या अनिष्ट प्रथांवर रॅपमधून प्रहार करतोय.

+
News18

News18

डोंबिवली, 28 ऑगस्ट : जंगलातून औषधी वनस्पती गोळा करणे , त्या वनस्पतीला कुटून त्याची पावडर बनवणे आणि ही बनवलेली औषधे गावोगावी, दारोदारी विकणे हे वैदू समाजाचे मुख्य काम. आपल्या देशानं वैज्ञानिक प्रगती केली आणि हे काम मागे पडले. भटक्या विमुक्त समाजातील या मंडळींचा या क्षेत्रातला रोजगार घटला. या समाजावर जात पंचायत आणि व्यसानाधिनतेचा पगडा आहे. या सर्व अडचणींवर मात करत या समाजातील मुलं शिक्षण घेऊन नव्या वाटा निवडत आहेत.
कल्याण जवळ विठ्ठववाडीमध्ये राहणारा व्यंकटेश दासरी हा यापैकी एक तरुण आहे. व्यंकटेश स्वत: पाल्यात राहतो. त्यानं लहाणपणापासूनच सभोवताली प्रतिकूल परिस्थिती पाहिलीय. त्यानंतरही त्याची जिद्द कमी झालेली नाही. व्यंकटेश वैदू समाजाच्या भाषेत रॅप साँग लिहितो आणि समाजप्रबोधनासाठी गातोही. 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं तो मित्रांबरोबर रॅप साँगमधून समाज प्रबोधन करत आहे.
advertisement
भावना कागदावर उमटतात...
व्यंकटेश सातारामधल्या भटक्या विमुक्त जमातीसाठी स्थापन केलेल्या आश्रम शाळेत शिकला. तो सध्या पदवीचं शिक्षण घेतोय. त्याचबरोबर अनुभूती या सामाजिक संस्थेबरोबर कामही करतो. हे सर्व करत असताना आपल्या समाजात आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचा तो विचार करतो. समाजात घडत असलेले चित्र तो पाहतो. त्यामधून निर्माण झालेल्या भावना तो रॅप साँगच्या माध्यमातून लिहतोय.
advertisement
समाजात सुरू असलेल्या अंधश्रद्धा आणि जात पंचायत हे विषय तो रॅपमधून मांडतोय. एखादी अंधश्रद्धा पूर्ण करण्यासाठी पैसे आहेत, पण शिक्षणासाठी नाहीत ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, असं व्यंकटेशनं सांगितलं.
31 ऑगस्ट विमुक्त दिन
इंग्रजांनी भटक्या विमुक्त समाजाला गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यावर हा कायदा रद्द करण्यात आला. हा कायदा ज्यावेळी रद्द करण्यात आला ती ऑगस्ट महिन्यातील 31 तारीख होती. म्हणून हा महिना विमुक्त महिना म्हणून साजरा केला जातो.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Video : झोपडीत राहणाऱ्या मुलाची भरारी, रॅप साँगमधून करतोय समाजात जागृती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement