दुधाचा दर्जा भारी, महिन्याला कमाई 3 ते 4 लाख! शेतकऱ्याकडून जाणून घ्या बिझनेस मॅाड्युल!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन कडे वळत आहे आणि याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत असल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील शेतकरी अर्जुन गवळी यांनी दोन एकर शेती सांभाळत गिर गाय पालन करत आहे.
सोलापूर: शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन कडे वळत आहे आणि याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत असल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील शेतकरी अर्जुन गवळी यांनी दोन एकर शेती सांभाळत गिर गाय पालन करत आहे,तर गिर गायीच्या दूध, तूप आणि शेणखत विक्रीतून ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे.
कुरुल गावात राहणाऱ्या अर्जुन गवळी यांनी पारंपारिक पद्धतीने दोन एकर मध्ये पिकांची लागवड करत आहे. पारंपारिक पिकांमधून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने अर्जुन यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करायचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला 10 गिर गायपासून दूध विक्री व्यवसायाला सुरुवात केली. आज अर्जुन गवळी यांच्याकडे जवळपास 200 गिर गाय आहे. अर्जुन हे गिर गाईचा दूध 60 रुपये लिटर प्रमाणे विक्री करत आहे. तर गिर गाईचा शेणखत 10 हजार रुपये ट्रॉली विक्री करत आहे. तसेच गीर गाईपासून तूप बनवून 2 हजार रुपये किलो प्रमाणे विक्री करत आहे.
advertisement
200 गीर गाईंना उसाच्या शेतकऱ्याकडून खाण्यासाठी वाडा विकत घेऊन येतात. कुरुल गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील दूध व्यवसायिक व गवळी अर्जुन यांचा कडूनच दूध विक्रीसाठी घेऊन जात असतात. तर या व्यवसायातून अर्जुन गवळी हे महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे. गीर गाईचा दूध आरोग्याला उत्तम असल्यामुळे गावातील लोक अर्जुन गवळी यांच्याकडून दूध खरेदी करून घेऊन जातात. एका गिर गाय पासून महिन्याला अर्जुन गवळी यांना 300 ते 400 लिटर दूध मिळत असतो. तर खर्च वजा करून एका गीर गाय पासून अर्जुन गवळी यांना 20 ते 25 हजार रुपयांचा उत्पन्न मिळतो.
advertisement
देशी गिर गाय पासून दर्जेदार दूध तूप आणि शेणखत ची विक्री करून शेती सांभाळात शेतकरी अर्जुन गवळी हे महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे. शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पन्न मिळत नसेल तर पशुपालन सुरू करा व असे आवाहन पशुपालक शेतकरी अर्जुन गवळी यांनी केले आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 24, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुधाचा दर्जा भारी, महिन्याला कमाई 3 ते 4 लाख! शेतकऱ्याकडून जाणून घ्या बिझनेस मॅाड्युल!

