81 वर्षीय आजोबाच्या हाताची चवच भारी, शिक कढई खाण्यासाठी नेहमी गर्दी

Last Updated:

वयाच्या 81 व्या वर्षी देखील मल्हारी नरसिंह चाकोते पुढे नेण्याचा काम करत आहे.चाकोते यांच्या मटन भाजनालयामध्ये खवय्यांची शिक कढई बनवून घेण्यासाठी व खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते.

+
81
title=81 वर्षीय आजोबाच्या हाताची चवच भारी,शिक कढई खाण्यासाठी नेहमी गर्दी

/>

81 वर्षीय आजोबाच्या हाताची चवच भारी,शिक कढई खाण्यासाठी नेहमी गर्दी

सोलापूर - ब्रिटिश राजवटीच्या काळात नरसिंह चकोते यांनी आंध्रप्रदेश येथून सोलापुरात येऊन मटन भाजनालयाचा व्यवसाय सुरू केलेला व्यवसाय आजही सोलापूर शहरातील पेंटर चौकात सुरू आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील मल्हारी नरसिंह चाकोते पुढे नेण्याचा काम करत आहे.चाकोते यांच्या मटन भाजनालयामध्ये खवय्यांची शिक कढई बनवून घेण्यासाठी व खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. तर या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
मल्हारी नरसिंह चाकोते वय 82 वर्षे रा. बेगम पेठ पेंटर चौक सोलापूर यांच्या चाकोते मटन भाजनालय येथे शिक कढई खाण्यासाठी खवय्यांची नेहमी गर्दी असते. चाकोते कुटुंब हे मूळचे आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहे. मल्हारी यांचे वडील नरसिंह यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात हा व्यवसाय सुरू केलेला व्यवसाय पुढे नेण्याचं काम मल्हारी चाकोते करत आहे. मल्हारी चाकोते यांच्या भाजनालयामध्ये चिकन व बोकडाच्या मटणापासून शिक कढई बनवून दिले जाते. एक किलो शेकडे बनवण्यासाठी मल्हारी चोकोते 280 रुपये घेतात.
advertisement
एक किलो शिक कढाई बनवण्यासाठी 280 रुपये घेतले जातात.तर महिन्याला या शिक कढईच्या व्यवसायातून मल्हारी चाकोते महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
तर काही जण शिक कढई बनवून खाण्यासाठी घरी घेऊन जातात, तर काहीजण तिथेच बसून खातात. सोबतच ज्वारीची कडक भाकरी देखील खाण्यासाठी दिली जाते. तर बीएससी कॉम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेऊन मल्हारी यांचं नातू देखील आजोबा सोबत शिक कढई तयार करत आहे. पुण्यातील एका नामावंत कंपनीतून महिन्याची वीस हजार रुपये पगार सोडून मल्हारी यांचे नातू शिक कढई बनवून देण्याचा काम करत आहे. पिढ्यान पिढ्या सुरू असलेला हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मल्हारी यांचं नातू ने जॉब सोडून आपला व्यवसाय पुढे नेण्याचा काम करत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
81 वर्षीय आजोबाच्या हाताची चवच भारी, शिक कढई खाण्यासाठी नेहमी गर्दी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement