Traffic Updates: जुन्या मुंबई- पुणे हायवेवर ट्राफिक जाम, दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mumbai- Pune Highway Traffic Updates: जुन्या मुंबई पुणे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. आपल्या गावी दिवाळी साजरी केल्यानंतर आता नोकरदार वर्ग आपल्या घरी मुंबईसह इतरत्र शहरांमध्ये परतताना दिसत आहे.
जुन्या मुंबई पुणे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. आपल्या गावी दिवाळी साजरी केल्यानंतर आता नोकरदार वर्ग आपल्या घरी मुंबईसह इतरत्र शहरांमध्ये परतताना दिसत आहे. त्यातच आज शनिवार- रविवार देखील आहे, त्यामुळे नोकरदारांचीही आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांचीही एकच गर्दी पाहायला मिळत आहे. नुकतीच दिवाळी सण संपला आहे, त्यामुळे नोकरदार वर्ग पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी आपल्या घरची वाट पकडत आहेत.
अनेक महामार्गांवर गावाला जातानाही आणि गावावरून येतानाही मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकचा सामना नोकरदारांना करावा लागत आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेवरील सोमाटने टोलनाक्याजवळील चौकात वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगच रांगा पाहायला मिळत आहे. महामार्गावर वाहनांच्या जवळपास दोन- तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान, उर्से टोलनाक्यावरून येणाऱ्या रोडलाही मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीची सुट्टी आणि त्यानंतर शनिवार- रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आपल्या खाजगी वाहनाने परत मुंबईच्या दिशेने जात आहे.
advertisement
मात्र हे होत असताना एकच ट्रॉफिक हवालदार रोडवर असून वाहनांची कोंडी काढून ट्राफिक नीट करण्याचा ते प्रयत्न करीत आहे. मात्र या दोन ते तीन किलोमीटरच्या लागलेल्या वाहनांच्या रांगामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळामध्ये या मार्गावर अनेक मोठ्या प्रमाणावर ट्रॉफिक पाहायला मिळत असते. शिवाय, विकेंडच्या वेळीही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळते. पुणे, नाशिक, कोकण इतर परिसरातील नोकरदार वर्ग आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाताना दिसत आहे. त्यातच सलग विकेंड आल्यामुळे अनेक नोकरदार सुट्टी घालवण्यासाठी बाहेर जाताना दिसत आहेत.
advertisement
दरम्यान, जुन्या मुंबई पुणे हायवेवर पोलिसांनी ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पथक तैनात करण्यात आली आहे. तसेच जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आल्याची माहिती मिळतेय. जेणेकरून नोकरदार वर्गाला आपआपल्या घरी परतण्यासाठी अडचण येऊ नये. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरील वाहनसंख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रॅफिक अपडेट्स तपासूनच मार्ग निवडावा, असा सल्लाही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 25, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Traffic Updates: जुन्या मुंबई- पुणे हायवेवर ट्राफिक जाम, दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा...


