Nanded: मुलीला उचललं आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसवून ते दोघे पळाले, लोक फक्त पाहत होते, नांदेडमधील घटना
- Published by:Sachin S
 - Reported by:Mujeeb Shaikh
 
Last Updated:
नांदेड शहरातील रेल्वे स्थानकाजवळील रोडवरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. एक तरुण आणि तरुणी रस्त्यावर झटापटी करताना दिसत आहेत.
नांदेड:  नांदेडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, मारामारी आणि अपहरणाच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होत नाहीये. अशातच नांदेड शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी दोन तरुणांनी एक तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून फरार झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, घटनास्थळी मोठ्या संख्येनं लोक उपस्थितीत होते. पण कुणीही त्यांना अडवू शकलं नाही. हा सगळा प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  नांदेड शहरातील रेल्वे स्थानकाजवळील रोडवरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. एक तरुण आणि तरुणी रस्त्यावर झटापटी करताना दिसत आहेत. हा तरुण त्या तरुणीला सोबत येण्यासाठी  जबरदस्ती करत होता. पण ती तरुणी त्याला दूर ढकलत होती. पण त्याने तरुणीला जबरदस्तीने उचलून घेतलं आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसवलं आणि ते दोघे तरुणीला घेऊन दुचाकी घेऊन पसार होतात.
advertisement
नांदेडमधील घटना, वर्दळीच्या रस्त्यावर दोन तरुण एका तरुणीला जबरदस्तीने उचलून दुचाकीवर बसवून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/OyGkOX91PU
— VIRALबाबा (@viralmedia70) July 30, 2025
हा प्रकार जेव्हा सुरू होता, त्यावेळी तिथे उपस्थितीत लोकांना हा प्रकार नेमका चालला काय हे कळत नाही. गर्दीतून एक जण त्या तरुणाला रोखण्यासाठी पुढे येण्याची भाषा करतो. पण कुणीही पुढे यायला तयार होत नाही. मात्र,हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला. हा व्हिडीओ नांदेड शहरात व्हायरल झाला.
advertisement
या व्हिडीओची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.  व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला. रात्री उशिरा या तरुणीची सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ती तरुणी त्या तरुणांची कुणी होती का, की अन्य काही प्रकार आहे. याचा तपास आता पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
July 30, 2025 10:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: मुलीला उचललं आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसवून ते दोघे पळाले, लोक फक्त पाहत होते, नांदेडमधील घटना


