BREAKING: भाजपची मनसेशी जवळीक, आता एकनाथ शिंदेंचा शिलेदार शरद पवारांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एकीकडे भाजप-मनसेची जवळीक वाढत असताना पडद्यामागं मोठी खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत. तसं तसं महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग येत आहेत. अलीकडेच मुंबईत बेस्टची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा सपशेल पराभव झाला. या निवडणुकीनंतर मुंबईसह राज्यातील राजकीय घडामोडी वेगानं बदलत आहेत. बेस्ट निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी जवळपास ५० मिनिटं बंद दाराआड चर्चा केली होती.
या भेटीनंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे - भाजप युतीच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. त्यांनी कायमस्वरुपी एकत्र राहण्याचा निर्धार केला होता. मात्र बेस्टच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे बंधुंची युती काहीशी कमकुवत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.
advertisement
असं असताना आता पडद्यामागं मोठी खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पुढच्या काही वेळात ते पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल होणार आहेत. एकीकडे भाजप मनसे यांची जवळीक वाढत असताना सामंत शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
उदय सामंत नेमकं कोणत्या कारणासाठी शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र मनसे आणि भाजप नेत्याच्या भेटीगाठी होत असताना उदय सामंत शरद पवारांच्या भेटीसाठी जात असल्याने या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: भाजपची मनसेशी जवळीक, आता एकनाथ शिंदेंचा शिलेदार शरद पवारांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?