Uddhav Thackeray Exclusive : सरन्यायाधीश लोकशाहीला न्याय देऊ शकले नाही, ठाकरेंची टीका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड नुकतेच निवृत्त झाले आहेत.या निवृत्तीवर शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड नुकतेच निवृत्त झाले आहेत.या निवृत्तीवर शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. आपले सरन्यायधीश निवृत्त झाले, ते महाराष्ट्राचे होते, त्यांच्या अपयशाचं संचित घेऊन निवृत्त होत आहेत. हे लोकशाहीला न्याय देऊ शकले नाहीयेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांवर केली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी ही टीका केली आहे.
खरं तर महाराष्ट्राती सत्तासंघर्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रावादी आमदाराच्या अपात्रते प्रकरणी ठाकरे आणि शरद पवार सुप्रिम कोर्टात गेले होते. आणि हे प्रकरण सरन्याय़ाधीश यांच्या बेंचसमोर होते. त्यामुळे सरन्यायाधीश त्यांच्या निवृत्तीपुर्वी या प्रकरणाचा निकाल देतील, अशी अपेक्षा होती. मात्र यावर अद्याप निकाल लागू शकला नाही, त्यामुळे ठाकरेंनी कडक शब्दात यावर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
ठाकरे म्हणाले की, आपले सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत, ते आता निवृत्त झाले आहे. त्यांच्या अपयशाचं संचित घेऊन ते निवृत्ती झाले आहे.पण ते लोकशाहीला न्याय देऊ शकले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
मी आताच मध्यंतरी ऐकलेलं की 8 तारखेला सुनावणी आहे. पण मी आधीच बोलेलो ही सुनावणी आहे की बतावणी आहे,हे कळेल आणि ती बतावणी निघाली आहे. आता मला वाटतंय चंद्रचुड यांना घेऊन यमाई देवीच्या मैदानातच जाणार आहे. काय तो न्याय द्या आम्हाला..असा टोला देखील ठाकरेंनी सरन्याधीशांना लगावला आहे.
advertisement
ठाकरे पुढे म्हणाले की, आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाही, जास्त कपटी खूनशी आणि खालच्या पातळीवर गेलं आहे. स्वत: चं कर्तृत्व नाही, किंमत नाही पक्ष फोडायचा पळवायचा आणि मग माझाच पक्ष सांगायचा, असा टोला देखील ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.तसेच आता न्याय आता कधी मिळल हा पण प्रश्न आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Exclusive : सरन्यायाधीश लोकशाहीला न्याय देऊ शकले नाही, ठाकरेंची टीका


