Maharashtra Election : पुतण्या अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा देणार? उद्धव ठाकरे म्हणाले...

Last Updated:

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. हा वचननामा नागरिकांना क्युआर कोडद्वारे स्कॅन करून वाचता येणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रचार दौर्याचे वेळापत्रक समोर आले आहेत. या वेळापत्रकात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माहिम मतदार संघात कोणताच प्रचार दौऱा नसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुतण्या आणि मनेसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. या चर्चावर आता उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. हा वचननामा नागरिकांना क्युआर कोडद्वारे स्कॅन करून वाचता येणार आहे. या दरम्यान पत्रकारांनी ठाकरेंना अमित ठाकरेंना देण्यात येणाऱ्या छुप्या पाठिंब्याविषयी विचारले असता, ठाकरे म्हणाले, माहिममध्ये सभा घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही.माहिम हा मतदार संघ आमचाच आहे. असे म्हणत ठाकरेंनी मुळ उत्तर देणे टाळले आहे.त्यामुळे जरी ठाकरे उघडपणे बोलत नसले तरी त्यांचा छुपा पाठिंबा अमित ठाकरेंना असणार आहे.
advertisement
शिवाजी पार्कला १७ नोव्हेंबर सभा घेणार आहोत. आम्ही या सभेसाठी परवानगी मागितली आहे. तसेच हा दिवस शिवसेना प्रमुखांचा स्मरण दिन आहे. त्यामुळे लाखो शिवसैनिक तिथे येत असतात आणि यावर्षीही येणार.त्यामुळे निवडणुक आयोगाच्या आणि पोलिसांच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका.तुम्ही शिवसैनिकांना अडवू शकत नाही. त्यामुळे कुठेही संघर्षाची ठिणगी पडू नये यासाठी आम्ही जी सभेची मागणी केली आहे ती मान्य करावी, असे ठाकरे म्हणाले आहेत.
advertisement
ठाकरेंच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे
राज्यातील बेरोजगारी हटवणार
कोळीवाड्याला मान्य असेल असा विकास करणार
धारावीकरांना तिथेच घर देणार
मुलांनाही मोफत शिक्षण देणार
जीवनावश्यक भाव स्थिर ठेवणार
राज्यातील भूमिपुत्रांसाठी नोकऱ्या देणार
कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करणार
जुनी पेन्शन योजना लागू करणार
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : पुतण्या अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा देणार? उद्धव ठाकरे म्हणाले...
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement