'माझ्या आत्महत्येची बातमी देऊ नका...' UPSC चं स्वप्न भंगलं, बालविकास अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुसाईड नोटमध्ये युपीएससीची शेवटची संधी हुकल्याने गळफास घेत असल्याचे म्हटले आहे.
लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची शेवटची संधी हुकल्याच्या नैराश्यातून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. लातुरमधील एका लॉजवर अधिकाऱ्याने जीवनयात्रा संपवली आहे. या अधिकाऱ्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट देखील आढळून आली आहे. या प्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रामदास श्रीरामे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडी येथील मूळचे असलेले रामदास श्रीरामे हे सध्या नागपूर येथे शासकीय विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते घरी अमरावती येथे प्रशिक्षणासाठी जात आहे, असे सांगून घराबाहेर पडले होते. सोमवारी लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या एका लॉजवर ते उतरले.
बराच वेळ दरवाजा ठोठावला पण...
advertisement
पहिल्या दिवशीचे पैसे भरले होते मात्र दुसऱ्या दिवसाचे पैसे दिले नव्हते. त्यामुळे लॉजमधील कामगार त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. बराच वेळ दरवाजा ठोठवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने कामगारने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडला, त्यांना आतमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती.
advertisement
स्पर्धा परीक्षेतून मोठ्या हुद्द्यावर पोहचण्याचे स्वप्न
सुसाईड नोटमध्ये युपीएससीची शेवटची संधी हुकल्याने गळफास घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी माझ्या मृत्युची बातमी देऊ नका, अन्यथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण निराश होतील, असे देखील म्हटले आहे. पैशांची समान वाटणी करण्याचे देखील त्यांनी लिहलेले आहे. स्पर्धा परीक्षेतून मोठ्या हुद्द्यावर पोहचण्याचे त्यांचे स्वप्न होते.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
August 11, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझ्या आत्महत्येची बातमी देऊ नका...' UPSC चं स्वप्न भंगलं, बालविकास अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल


