Success Story: चारवेळा फेल, अखेर पाचव्यांदा मारली बाजी, यवतमाळच्या रिक्षाचालकाची अबिदा झाली IAS

Last Updated:

Success Story: आदिबाने यूपीएससी 4 वेळा प्रयत्न केला, अखेर पाचव्या प्रयत्नात यश मिळाले. 

News18
News18
यवतमाळ : आयुष्याच्या प्रवासात लाख संकटे येत असतात, मात्र अशा विपरीत परिस्थितीमध्ये जे सातत्याने प्रयत्न करत ध्येयाकडे वाटचाल करत राहतात विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. असाच काहीसा प्रेरणादाई प्रवास राहिला आहे तो यवतमाळच्या आदिबाचा... केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC 2024) अंतिम निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या यवतमाळची अदिबाने भारतातून 142 वी रँक प्राप्त केली आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससी 4 वेळा प्रयत्न केला, अखेर पाचव्या प्रयत्नात यश मिळाले.
आदिबाचे वडील रिक्षा चालक तर आई गृहिणी आहे. वडिलांची कमाई मर्यादित असल्याने घरची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मात्र मुलीच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वडिलांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि आपल्या परिस्थितीची मुलीला जाणीव सुद्धा होऊ दिली नाही. आदिबा चे सुरुवातीचे शिक्षण यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतून झाले. त्यानंतर ती तिने पुणे येथून पदवीचे शिक्षण घेतले. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC 2024) ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे.
advertisement

अपयशाने खचली नाही

सुरुवातीला तिने चांगलं शिक्षण घेण्याचा विचार केला. यूपीएससीकडे कधी जाईल असं वाटलं नव्हतं. डॉक्टरकीचं शिक्षण घेऊ न शकल्याने तिने यूपीएससीचा मार्ग पत्करला. आणि अखेर यश मिळाले. तिच्या यशाने नातेवाईक आणि आजूबाजूचे सर्व लोकच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येते आहे. तिने संपादित केलेल्या रँकमुळे तिला IAS पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे आदिबा अनम ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनणार आहे.
advertisement

यशामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा 

आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामिया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती. तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळेल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Success Story: चारवेळा फेल, अखेर पाचव्यांदा मारली बाजी, यवतमाळच्या रिक्षाचालकाची अबिदा झाली IAS
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement