EVM ची पूजा करणं भोवलं, भाजप आणि NCP च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल, मावळात राडा

Last Updated:

वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव मावळ नगर पंचायत निवडणूक
वडगाव मावळ नगर पंचायत निवडणूक
अनिस शेख, प्रतिनिधी, मावळ : निवडणूक संपन्न होताच मावळात राड्याला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीला मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्र कक्षाची पूजाअर्चा करून आचारसंहितेचा भंग व परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

कुणाकुणावर गुन्हा दाखल?

भाजपच्या उमेदवार ॲड मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष नवनाथ दळवी आणि भागवत झांबरे यांनी फिर्याद दिली आहे.
advertisement

पूजाअर्चा करणं भोवलं

पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील २४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक ६ आणि प्रभाग क्रमांक ८ या दोन मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केंद्राध्यक्ष दळवी आणि भागवत यांनी मज्जाव केला असताना मृणाल म्हाळसकर, अबोली ढोरे आणि मयुर ढोरे यांनी दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रातील मतदान कक्षाची पूजाअर्चा केली.
advertisement
त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम-२२१, २२३, १७१ (ब) सह लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३०, १३१, १३२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम व पोलिस उपनिरीक्षक उमेश जाधवराव हे करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
EVM ची पूजा करणं भोवलं, भाजप आणि NCP च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल, मावळात राडा
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement