वैभव खेडेकरांना डबल झटका, आधीच भाजप प्रवेश रखडला अन् आता आरक्षणाचा धक्का
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vaibhav Khedekar: भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेले आणि दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. कोकणातील महत्त्वाची असलेली खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेले आणि दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला आहे.
वैभव खेडेकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्ष स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरे यांच्याबरोबर होते. कोकणात मनसेला वाढविण्यात आणि पक्षाच्या बांधणीत त्यांचे महत्त्वाचे काम होते. तसेच राज्यातील एकमेव खेड नगर पालिकेवर मनसेचा झेंडा रोवण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
खेडेकरांना दुहेरी धक्का
मात्र काही दिवसांपूर्वी मनसेतून खेडेकर यांची हकालपट्टी करण्यात आली. मनसेतून बाहेर पडल्यानंतर खेडेकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेशसाठी इच्छुक होते. शीर्षस्थ नेत्यांसोबत त्यांची बोलणीही झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, यासाठी खेडेकर यांना पक्षात प्रवेश देण्यास भाजपही तयार झाले. परंतु कुठल्याशा कारणाने त्यांचा पक्षप्रवेश रखडला. भाजपमध्ये प्रवेशही झाला नाही आणि नगर परिषदेचे आरक्षणही महिलेसाठी राखीव झाल्याने खेडेकर यांना दुहेरी धक्का बसला.
advertisement
कोण आहेत वैभव खेडेकर?
वैभव खेडकर मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत होते
खेड नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले
राज ठाकरे जेव्हाही कोकणात जायचे, त्यावेळी दौऱ्याची सगळी जबाबदारी खेडेकर यांच्याकडे असायची
राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी म्हणूनही खेडेकर यांची ओळख होती
जनतेशी थेट संपर्क असल्याने आणि युवा वर्गाशी त्यांचे उत्तम जमत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा होता
advertisement
काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून हकालपट्टी
सध्या भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर
कुठे कोणतं आरक्षण?
खुल्या महिला प्रवर्गासाठी 68 नगरपरिषदा राखीव
अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 16 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद राखीव
ओबीसी महिलांसाठी 34 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपद राखीव
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 06, 2025 3:35 PM IST








