VBA : वंचित आघाडीचा जलवा, प्रस्थापितांना दिला दणका, 3 पालिकेत निळं वादळं; विजयी उमेदवाराची यादी

Last Updated:

अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर  आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचित आघाडीचं निळं वादळं आलं आहे. 

News18
News18
मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सत्तधारी भाजप आणि शिवसेनेनं बऱ्याच महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवारही विजयी झाले आहे. पण, दुसरीकडे प्रस्थापितांना धक्का देत वंचित आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर  आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचित आघाडीचं निळं वादळं आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राऊंड असलेल्या अकोला महापालिकेमध्ये वंचित आघाडीने विजयी सुरुवात केली आहे.  अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर,  पराग रामकृष्ण गवई आणि शेख समशू कमर शेख साबीर हे पॅनल विजयी झालं आहे. तर अकोला महानगरपालिका निवडणुकीत 1600 मतांनी निलेश देव यांचा विजय झाला आहे.
advertisement
अकोला पालिकेतील विजयी उमेदवार
1) उज्वलाताई प्रवीण पातोडे
2 जयश्रीताई महेंद्र बहादूरकर
3)पराग रामकृष्ण गवई
4) शेख समशू कमर शेख साबीर
५)निलेश देव
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपने आघाडी घेतली आहे. पण प्रभाग क्रमांत २४ मध्ये वंचित आघाडीचं संपूर्ण पॅनल विजयी झालं आहे.
१)सतीश आसाराम गायकवाड (A)
२) जगताप अनुजा अमर (b)
advertisement
३) सुनिता रामराव चव्हाण (c)
४) रवी भिकाजी चव्हाण(d)
तर, काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास १२ टक्के आहे. पण, वंचितच्या छताखाली मतदार एक झाले आणि पाच पैकी ४ ही उमेदवारांना विजयी करून दिलं आहे. लातूरमधला वंचित आघाडीचा विजय हा सगळ्या मोठा समजला जात आहे.
advertisement
लातूरमधील विजयी उमेदवार
प्रभाग 13 अ
अमोल भाऊ लांडगे
प्रभाग क्र 04 अ
सचिन अर्जुन गायकवाड
प्रभाग क्र. 07 अ
निकिता रोहित सोमवंशी
प्रभाग क्र.02 अ
अंकिता प्रशांत भडीकर
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VBA : वंचित आघाडीचा जलवा, प्रस्थापितांना दिला दणका, 3 पालिकेत निळं वादळं; विजयी उमेदवाराची यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement