Thackeray Alliance : 'मी असं कधीच पाहिलं नाही, दोन्ही नेत्यांना...', पुण्याच्या Vasant More यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...

Last Updated:

Vasant more on Thackeray victory rally : मुंबईच्या मेळाव्याला रवाना होताना वसंत मोरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. मराठी माणसांच्या मनातील हा आजचा आनंदाचा दिवस आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : अख्खा महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहत होता, तो क्षण आता आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना मुंबईतील संयुक्त रॅलीसाठी "वाजत गाजत या" असं आवाहन केलं आहे. पुण्यातील डॅशिंग नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नेमकं काय म्हणाले वसंत मोरे? पाहा

ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वरळी येथे सकाळी 10 वाजता संयुक्त रॅली सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी वसंत मोरे यांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर वसंत मोरे यांनी मनसेमधून ठाकरे गटात वाया वंचित, प्रवेश केला होता. राज ठाकरे यांचा आदेश न मानता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. अशातच वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement

आजचा आनंदाचा दिवस - वसंत मोरे

मुंबईच्या मेळाव्याला रवाना होताना वसंत मोरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. ते म्हणाले की, मराठी माणसांच्या मनातील हा आजचा आनंदाचा दिवस आहे, कारण वीस वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्रित येत आहेत, ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
advertisement

माझ्यासाठी हा क्षण खूप वेगळा - वसंत मोरे

दरम्यान, "मी दोन्ही पक्षात (मनसे आणि ठाकरे गट) काम केले, पण या दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर मी कधीच पाहिले नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा क्षण खूप वेगळा असेल.", अशा भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे यांच्यासाठी हा भावनिक क्षण असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thackeray Alliance : 'मी असं कधीच पाहिलं नाही, दोन्ही नेत्यांना...', पुण्याच्या Vasant More यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement