कळमनुरीत चांगले हॉस्पिटल नाही, शाळांची दुरावस्था, दंड ठोकणाऱ्याला ठोकून काढा: सुजात आंबेडकर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
हिंगोलीच्या कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली.
मनीष खरात, प्रतिनिधी, हिंगोली : दंड ठोकणाऱ्या आमदाराला ठोकून काढण्याची जबाबदारी तुमची. दुरून ओरडणारी लोकं चावत नाहीत. त्यांनी एकदा नडून बघावे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला.
हिंगोलीच्या कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी सुजात आंबेडकर यांनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
दुरून ओरडणारी लोकं चावत नाहीत, एकदा नडून बघा, सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल
कळमनुरी शहरात चांगले हॉस्पिटल नाही, शाळांची दुरावस्था आहे. आणि तुमचे आमदार काय करतात तर आपले दंड ठोकतात. आता या दंड ठोकणाऱ्या आमदाराला ठोकण्याची जबाबदारी तुमची आहे. एकदा नडून तर बघा, दुरून ओरडणारी लोकं चावत नाहीत, नुसती दहशत निर्माण करतात, अशा शब्दात त्यांनी संतोष बांगर यांच्यावर बोचरी टीका केली. असले लोक दहशत निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाही. तुम्ही एकदा खेटलात ना तर आमदार नीट घरी जाऊन बसणार, असे सुजात आंबेडकर म्हणाले.
advertisement
निवडणुकीत वंचितला साथ द्या
आरक्षणाचा विषय असो की अन्याय, वंचितने नेहमीच यशस्वी आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. समाजातील सर्वच घटकांच्या पाठीशी सतत उभे राहत वंचितने समस्या मार्गी लावल्या आहेत. आता जनतेने निवडणुकीत वंचितला साथ द्यायला हवी, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.
view commentsLocation :
Hingoli,Maharashtra
First Published :
November 15, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कळमनुरीत चांगले हॉस्पिटल नाही, शाळांची दुरावस्था, दंड ठोकणाऱ्याला ठोकून काढा: सुजात आंबेडकर


