Devendra Fadnavis : महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ, विजयानंतर फडणवीसांची पहिली रिएक्शन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने धमाका केला आहे, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने धमाका केला आहे, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत महायुती 223 जागांवर तर महाविकास आघाडी 56 जागांवर आघाडीवर आहे. एकटी भाजपच 125 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना 55 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 39 ठिकाणी आघाडीवर आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे 19 जागांवर तर काँग्रेसही 19 जागांवर आघाडीवर आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत 12 जागांवर आघाडी मिळाली आहे.
महायुतीला मिळालेल्या या दणदणीत विजयानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
एक है तो ‘सेफ’ है !
मोदी है तो मुमकिन हैं ! #Maharashtra #महाराष्ट्र
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे चा नारा दिला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ हे अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच घोषणेचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 1:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ, विजयानंतर फडणवीसांची पहिली रिएक्शन!


