'बाळासाहेबांचं कौतुक करण्याचं धाडस आहे?', पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला चॅलेंज!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत, शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मान्य करण्याचं आव्हान केलं आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत, शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मान्य करण्याचं आव्हान केलं आहे. महाराष्ट्रातील एका सभेत बोलताना मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील असामान्य योगदानाबद्दल आवर्जून सांगितलं. मोदी म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरेंचं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतुलनीय योगदान आहे. पण काँग्रेस नेत्यांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंच्या कौतुकाचा एकही शब्द बाहेर येत नाही'.
'महाविकासआघाडीतील माझ्या काँग्रेस मित्रांना मी आव्हान देतो काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करावं आणि त्यांच्या विचारधारेला मान्यता द्यावी', असं मोदी म्हणाले.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबाबत काँग्रेसचे नेते आजपर्यंत मौन बाळगून असल्याचं सांगून मोदींनी महाविकासआघाडीवर थेट हल्ला केला. ठाकरेंनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचं भान राखणारे विचार मांडले, जे काँग्रेसच्या विचारसरणीपासून बऱ्याच बाबतीत वेगळे आहेत, यावरूनच मोदींनी काँग्रेसला आव्हान दिलं आहे.
advertisement
मोदींच्या या टिप्पणीने काँग्रेसने शिवसेनेच्या विचारांशी जुळवून घेतले तरी निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया अपेक्षित असली, तरी काँग्रेसमधील काही नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी करताना त्यांच्या विचारधारेतील तफावत मान्य केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बाळासाहेब ठाकरेंच्या योगदानाची प्रशंसा न करण्याबाबत काँग्रेसच्या मौनावर मोदींनी बोट ठेवलं आहे.
advertisement
भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा मुद्दा कायमच उचलून धरला आहे. मोदींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेससाठी एक आव्हान निर्माण झालं आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची यावर काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मान्यता देण्यास तयार असल्याचं काँग्रेसनं सांगितलं तर त्यांना महाविकासआघाडीची एकता टिकवण्याची संधी मिळू शकेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2024 7:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बाळासाहेबांचं कौतुक करण्याचं धाडस आहे?', पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला चॅलेंज!


