PM Narendra Modi : महाराष्ट्रात महायुतीची त्सुनामी, पंतप्रधान मोदींचा शब्द खरा ठरला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सकाळी 11.30 वाजताच्या आकडेवारीनुसार महायुती 217 जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी 53 जागांवर आघाडीवर आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सकाळी 11.30 वाजताच्या आकडेवारीनुसार महायुती 217 जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी 53 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय इतर अपक्ष आणि छोटे पक्ष 18 जागांवर आघाडीवर आहेत. प्रत्येक पक्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप 125 जागांवरच्या आघाडीसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 20, शिवसेना उद्धव ठाकरे 19 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर आहे.
मतदानाआधीच मोदींचं आमंत्रण
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान व्हायच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराच्या शेवटच्या सभेत मी तुम्हाला शपथविधीचं निमंत्रण द्यायला आलो आहे, असं मोदी म्हणाले होते. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी भाजप आणि एनडीए सरकारच्या शपथविधीचं आमंत्रण दिलं होतं.
काय म्हणाले होते मोदी?
'आज मोदी का आले आहेत? मी तुमची मतं मागायला आलो आहे का? तुमचं प्रेम इतकं आहे, तुमचे आशिर्वाद एवढे आहेत, तुम्ही माझी झोळी भरून देता. पण मी आज तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. 23 तारखेला निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसांमध्ये भाजप एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होईल. मी तुम्हाला सगळ्यांना शपथविधीचं निमंत्रण द्यायला आलो आहे', असं नरेंद्र मोदी मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 12:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Narendra Modi : महाराष्ट्रात महायुतीची त्सुनामी, पंतप्रधान मोदींचा शब्द खरा ठरला!


