Vinod Tawde: 'भाजपवाले एवढे मूर्ख नाहीत...', पैसे वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडे स्पष्टच बोलले

Last Updated:

Vinod Tawde Cash-for-votes Case: विनोद तावडे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या गाडीत काहीही सापडलं नाही. मी 5 कोटी घेऊन गेलोय ही माहिती त्यांच्याकडे कन्फर्म होती, त्यांना असं वाटत असेल तर मला राहुल गांधी आणि सुप्रिया सुळेंनी पाठवून द्यावे, असा हल्ला विनोद तावडे यांनी चढवला.

Vinod Tawde: 'भाजपवाले एवढे मूर्ख नाहीत...', पैसे वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडे स्पष्टच बोलले
Vinod Tawde: 'भाजपवाले एवढे मूर्ख नाहीत...', पैसे वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडे स्पष्टच बोलले
Maharashtra Electin 2024, Vinod Tawde : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारच्या एका हॉटेलमध्ये क्षितीज ठाकुरांनी कार्यकर्त्यांसह घेरून पैसे वाटल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे देखील झाले आहेत. त्यामुळे या सगळ्या आरोपांवर आता विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. आम्ही विरोधकांच्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटू, इतके तर भाजपवाले आता मूर्ख राहिले नाहीत. आणि माझ्याकडे एक पैसा सापडला नाही, असे विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या गाडीत काहीही सापडलं नाही. मी 5 कोटी घेऊन गेलोय ही माहिती त्यांच्याकडे कन्फर्म होती, त्यांना असं वाटत असेल तर मला राहुल गांधी आणि सुप्रिया सुळेंनी पाठवून द्यावे, असा हल्ला विनोद तावडे यांनी चढवला.
कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत असतो. प्रचार न करता त्यांच्यासोबत चहा घेतला चर्चा केली तर त्यांनाही बरं वाटतं असतं. पण इतकं वातावरण स्थानिक उमेदवारानं करणे हे समजू शकतो, पण राष्ट्रीय नेत्यानं करणं म्हणजे लोकांनाही कळत असतं. त्यामुळे त्यांना भीती आहे की त्यांच्या हातून निवडणूक जाणार आहे. हे माहिती असल्याने ते अशा गोष्टींचा वाद करतायत, अशी टीका तावडेंनी ठाकुरांवर केली. तसेच याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, गळं वास्तव जनतेला आणि मतदारांना समजतं, असे तावडेंनी स्पष्टच सांगितले.
advertisement
विनोद तावडे यांनी यावेळी तीन गुन्हे नेमके कोणते दाखल झाले, याबाबतची ही माहिती दिली. पहिला गुन्हा हा मी मतदारसंघाबाहेर गेल्यामुळे दाखल झाला असावा.दुसरा गुन्हा हा आम्ही पत्रकार परिषद घेतल्यामुळे असाला. तिसरा गुन्हा हा हिंतेद्र ठाकूर त्यांचं मतदार संघ सोडून आल्यामुळे दाखल झाला आहे. आणि पैशांच्या विषयावर कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असे देखील विनोद तावडेंनी स्पष्ट केले.
advertisement
मी 20 वर्ष आमदार होतो ते कळतं मला. मी आत असतानाचे व्हिडीओ पण आहेत. पाच ते सात मिनिटं पण नव्हतं आम्ही निघणार होतो. आणि एकतर ते हॉटेल ठाकूर ग्रूपचच यांचंच आहे. मी एवढा मूर्ख नाही की त्याच्याच हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटायला, आम्ही विरोधकांच्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटून येतील इतके तर भाजपवाले आता मूर्ख राहिले नाहीत एवढं तर समजयाला पाहिजे. माझ्याकडे एक पैसा सापडला नाही, असे देखील विनोद तावडे यांनी सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vinod Tawde: 'भाजपवाले एवढे मूर्ख नाहीत...', पैसे वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडे स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement