Walmik Karad : जेलमध्ये राहूनही अण्णाची हवा, धनंजय मुंडेंना मोह सुटेना; दादांच्या बॅनरवर झक्कास रुबाबात फोटो
- Published by:Prachi Amale
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर वर वाल्मीक कराड यांचाही फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रमांक एकचा आरोपी असणारा आणि अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड जरी मकोका अंतर्गत कारागृहात आहे. बीडच्या परळीमध्ये अजित पवार गटाच्या 'वाल्मिकप्रेमी ' कार्यकर्त्यांनं वाढदिवसाच्या बॅनरवर शुभेच्छांच्या फोटोमध्ये वाल्मिक कराडचा फोटो लावत बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
बीडच्या परळी शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर वर वाल्मीक कराड यांचाही फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असून तो सध्या जेलमध्ये आहे.. मात्र राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या वाढदिवसाचा बॅनर वर वाल्मीक कराड यांचा फोटो झळकत असल्याने मोठी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नाही .मात्र त्याचा दरारा जिल्ह्याच्या पक्ष संघटनेत कायम असल्याचे दिसून आले आहे .
advertisement
बीडमध्ये वाल्मिक कराडचा दबदबा
अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या दिग्गजांच्या रांगेत चक्क सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर बीडमध्ये झळकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराड मकोका अंतर्गत कारागृहात असला तरी बीडमध्ये त्याचा दबदबा कायम असल्याचंच चित्र आहे.
परळी शहरात बॅनरबाजी
उद्या (15 जुलै) माजी मंत्री धनंजय मुंडेंचा वाढदिवस आहे. त्यानंतर 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचावाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे बॅनर परळी शहरात लागले आहे. धनंजय मुंडे यांनी माझा वाढदिवस साजरा केला जाणार नाही. मी परळीत आणि मुंबईत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे. संतोष देशमुख प्रकरण न्यायालयात सुरू असताना देखील असे बॅनर झळकले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : जेलमध्ये राहूनही अण्णाची हवा, धनंजय मुंडेंना मोह सुटेना; दादांच्या बॅनरवर झक्कास रुबाबात फोटो


