Walmik Karad : वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर सुरेश धसांची मोठी मागणी, 'आका'चा पाय आणखी खोलात जाणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर आता सुरेश धसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिस घरादारापर्यंत गेली, चौकशीसाठी कुटुंबियांची उचलाउलची झाली आणि प्रॉपर्टी जप्त करायला लावली त्यामुळे शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून वाल्मिक कराड शरण आलेले आहेत, असे सुरेश धसांनी सांगितले आहे.
Walmik karad Surrender : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे.त्यानंतर आता सीआयडीने त्याची चौकशी सुरू केली आहे. तत्पुर्वी या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेत आवाज उठवणारे आणि वाल्मिक कराडवर आका म्हणत अटकेची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरेंडरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या पहिल्या प्रतिक्रियेत त्यांनी मोठी मागणी केली आहे.त्याच्या या मागणीनंतर वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे.
वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर आता सुरेश धसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिस घरादारापर्यंत गेली, चौकशीसाठी कुटुंबियांची उचलाउलची झाली आणि प्रॉपर्टी जप्त करायला लावली त्यामुळे शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून वाल्मिक कराड शरण आलेले आहेत, असे सुरेश धसांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या अॅक्शनमुळे शेवटी सीआयडीसमोर वाल्मिक कराडला यावंच लागलं,असे धसांनी सांगितले.
advertisement
वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी या सीझ झाल्याच पाहिजेत. अन्यथा आका जे अन्य गु्न्हे करत होते ते उघडे पडणार नाहीत. त्यामुळे प्रॉपर्टी सील झाल्याच पाहिजेत, अशी मोठी मागणी यावेळी सुरेश धसांनी केली आहे. अन्यथा आम्हाला अन्य मार्ग अवलंबवावा लागेल,असे देखील धसांनी सांगितले.
advertisement
सुरेश धस पुढे म्हणाले की, सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतिक घुले, विष्णू चाटे व्हिडिओ कॉल केले होते. त्यात आता शरण आलेले आका 120 ब मध्ये येतील. जर त्यांनी व्हिडिओ कॉल पाहिला असेल 302 मध्ये येऊ शकतात. तसेय या आरोपींवर 302, 120 ब, खंडणी आणि मोक्का हा लागणार आहे, अशी माहिती सुरेश धसांनी दिली.
advertisement
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत वाल्मिक कराडच्या सरेंडरवर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, जर वाल्मिक कराडवर 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मह त्याचं दिवशी शरण यायचं ना, मग बाहेर पळून कशाला गेले? शरण येण्यासाठी 23 ते 24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? असा संशय व्यक्त केला आहे.
advertisement
संतोष देशमुख प्रकरणात राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले गेल्याचे वाल्मिक कराडने व्हिडिओ संदेशात म्हटलं होतं.यावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, राजकीय द्वेष कोणाचा हे सगळ उघड्या डोळ्याने बघतोय, राज्यात तीन पक्षाचे आमदार बोलतायत, मी एकटा थोडी बोलतोय. भाजपचे दोन आमदार बोलतायत अजित पवारांचे तीन आमदार बोलतायत,असे सोनवणे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 31, 2024 2:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर सुरेश धसांची मोठी मागणी, 'आका'चा पाय आणखी खोलात जाणार?


