Wardha : वर्ध्याचा विकृत म्हातारा, श्वानालाही सोडलं नाही, सुनसान ठिकाणी नेऊन केलं घाणेरडं कृत्य
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार वर्ध्यातून समोर आला आहे. 67 वर्षांच्या वृद्धाने हे कृत्य केलं आहे.
वर्धा : श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार वर्ध्यातून समोर आला आहे. 67 वर्षांच्या वृद्धाने हे कृत्य केलं आहे. एका पशू प्रेमी व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. स्थानिक लोकांनी आरोपी वृद्धाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वर्धा जिल्ह्यातल्या अरवी भागातील मौजा धनोडी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. सोमवारी शाळेजवळ एक 67 वर्षांचा आरोपी श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. तेव्हा स्थानिक लोकांनी त्याला बघितलं आणि लगेच याची माहिती प्राणी अधिकार कार्यकर्त्याला दिली, यानंतर कार्यकर्ता घटनास्थळी पोहोचला.
प्राणी अधिकार कार्यकर्त्याने लगेचच अरवी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पशू क्रुरता निवारण अधिनियमांच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून गावकऱ्यांनी नराधमाला अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू झाली असून लवकरच त्याला अटक करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
advertisement
या घटनेनंतर आरोपी वृद्ध फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण विकृत नराधमाच्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
July 02, 2025 9:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha : वर्ध्याचा विकृत म्हातारा, श्वानालाही सोडलं नाही, सुनसान ठिकाणी नेऊन केलं घाणेरडं कृत्य