भाजप खासदार तडस यांना धक्का, अंधारेंच्या पत्रकार परिषदेतून सुनेचा गंभीर आरोप
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पूजा तडस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
नागपूर, उदय तिमांडे, प्रतिनिधी : वर्धा लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलंच तापलं आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या सून पूजा तडस यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुने विरोधात सासरा अशी लढत होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पूजा तडस यांच्या या आरोपांनंतर चर्चेला उधाण आलं आहे.
पूजा तडस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेमध्ये पूजा तडस यांनी तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.' मी लोकांपर्यंत माझं म्हणणं पोहोचविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुटुंबानं आपला छळ केला, मारहाण केली. माझ्या मुलाच्या डीएनए चाचणीचीही मागणी केली असा गंभीर आरोप पूजा तडस यांनी तडस कुटुंबींयावर केला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी भाजप नेते करतात मग माझ्यावर का अन्याय केला? असा सवाल पूजा तडस यांनी केला आहे.
advertisement
या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील उपस्थित होत्या. सुषमा अंधारे यांनी देखील या आरोपांनंतर भाजपला जोरदार टोला लगावला आहे. भाजप रामाचा आदर्श सांगतात, मग राम हे एक वचणी, एक पत्नी होते त्यांचं आचरण अमलात आणा असा टोला अंधारे यांनी यावेळी लगावला आहे.
पंकज तडस यांची प्रतिक्रिया
दरम्यान या आरोपांना रामदास तडस यांचा मुलगा आणि पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना पूजा तडस यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. कोर्टामध्ये केस सुरू आहे, मात्र पूजा या कोर्टात हजर राहात नाहीत. मात्र दुसरीकडे त्या पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात. एका राजकीय पुढाऱ्याला घेऊन त्यांनी आरोप केले. याबाबत आपल्याकडे पुरावे देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Apr 11, 2024 1:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
भाजप खासदार तडस यांना धक्का, अंधारेंच्या पत्रकार परिषदेतून सुनेचा गंभीर आरोप










