विद्यार्थ्यांना हसत-खेळत मिळणार मोठ्या प्रश्नांची उत्तर, शाळेचा अभ्यासही होणार सोपा
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
विद्यार्थ्यांना एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष नेऊन, प्रॅक्टिकल करुन काही प्रयोग दाखवले तर तो विषय चांगला समजतो.
वर्धा, 18 ऑगस्ट : शालेय विद्यार्थ्यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांबाबत अनेक प्रश्न पडत असतात. शालेय अभ्यासक्रमात किंवा शिक्षक तसंच पालकांना प्रश्न विचारुन ती हे उत्तर मिळवतात. विद्यार्थ्यांना एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष नेऊन, प्रॅक्टिकल करुन काही प्रयोग दाखवले तर तो विषय चांगला समजतो, असा अनुभव आहे. वर्ध्यातल्या विद्यार्थ्यांना हे समजून घेण्याची एक चांगली संधी आहे.
नागपूरच्या रमण विज्ञान केंद्र आणि तारा मंडळ यांच्याकडून विज्ञान प्रदर्शनी वर्धामध्ये दाखल झालीय. ही प्रदर्शनी वर्धा शहरासह ग्रामीण वेगवेगळ्या शाळांमध्ये पाठवण्यात येणार आहे. स्वच्छता आणि आरोग्याबद्दल जनजागृती करणे हा याचा उद्देश आहे.
कोणत्या प्रयोगाचा समावेश?
स्वच्छता आणि आरोग्याबाबत या बसमध्ये एकूण 20 प्रयोग आहेत. हात स्वच्छ धुणे, किचनमधली स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार, चांगला आहार, दातांची निगा यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे.
advertisement
या प्रदर्शनीमध्ये विज्ञानाचे मार्गदर्शक शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगाविषयी माहिती देऊन त्यांच्या शंका दूर करत आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थी व्हॉलेंटर्स म्हणून निवडले जातात. त्यांना या प्रयोगाबाबत प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते विद्यार्थी इतरांना तो प्रयोग समजावून सांगतात. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यात देखील या प्रदर्शनीचा उपयोग होतोय.
advertisement
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 18, 2023 12:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
विद्यार्थ्यांना हसत-खेळत मिळणार मोठ्या प्रश्नांची उत्तर, शाळेचा अभ्यासही होणार सोपा

