साईच्या चरणी अनोखी सेवा, पालखी सोहळ्यात तब्बल 5 किलोमीटर रांगोळी
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
संत साईबाबा पालखी सोहळ्यात तरुणाईच्या चमूनं तब्बल 5 किलोमीटर रांगोळी रेखाटली आहे.
वर्धा, 2 नोव्हेंबर: संत साईबाबांची पालखी म्हणजे भक्तांसाठी जणू एक सणच असतो. या पालखी सोहळ्यात अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपली सेवा देत असतात. अशाच प्रकारे वर्ध्यातील तरुणांचा एक चमू आपल्या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.  तब्बल 5 किलोमीटरच्या पालखी मार्गावर हे तरुण आकर्षक रांगोळी रेखाटतात.
शेकडो किलो रांगोळीचा उपयोग
दरवर्षी वर्धा येथील प्रसिद्ध श्री संत साईबाबांच्या मंदिराचा पालखी सोहळा होतो. या पालखी मार्गावर वर्धा येथील तरुण दरवर्षी आकर्षक रांगोळी काढतात. यादरम्यान जवळजवळ पाच किलोमीटर अंतर रस्त्यावर रांगोळ्यांनी अनोखा उत्साह देखील निर्माण होतो. यासाठी शेकडो किलो रांगोळीचा उपयोग केला जातो. लाल, पांढरा, हिरवा, निळा, पिवळा केशरी या रंगांनी सजलेल्या रांगोळ्यांवरून पालखीत सहभागी झालेले साईभक्त मार्गक्रमण करत असतात. त्याचं समाधान रांगोळी कलाकारांना होतं.
advertisement
परजिल्ह्यातील पालखी सोहळ्यातही सेवा
view commentsवर्ध्यातील तरुणांचा चमू आपल्या रांगोळ्यांच्या माध्यमातून नावलौकिक मिळवत आहे. वर्ध्याच्या बाहेरील जिल्ह्यांमध्ये देखील हे तरुण पालखी सोहळ्यात रांगोळ्या रेखाटत सहभागी होतात. मोठमोठ्या रांगोळ्या साकारणारा हा चमू 'रमन आर्टस् टीम'च्या नावाने ओळखला जातो. या टीमची सुरवात श्री संत साईबाबा यांच्या देवस्थानातूनच झाली. श्री संत साई बाबांच्या देवस्थानातूनच प्रेरणा मिळाली आणि साईबाबांच्या कृपेने सोन्याचे दिवस आले. आमची कला द्विगुणित झाली अशी भावना या टीम कडून व्यक्त केली जाते.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
November 02, 2023 9:58 AM IST

              