Mahavistar App: शेतात काय पेरायचं, कधी विकायचं? शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप सांगणार संपूर्ण माहिती

Last Updated:

कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरू केले आहे.

+
कोणत्या

कोणत्या हंगामात शेतीत काय पेरायचं, कधी विकायचं; शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲ

छत्रपती संभाजीनगर: कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरू केले आहे. त्यात शेती विषयक, हवामानासंदर्भात माहिती, पीकविषयी सल्ला, पिकांना द्याव्या लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज आणि कीडरोगांविषयी माहितीसह बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. महाविस्तार ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आला आहे. या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेती कामात निश्चित मदत होणार आहे.
काय आहे महाविस्तार ॲप ?
कृषी विभागाने तंत्राच्या मदतीने महाविस्तार हे ॲप शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तयार केले आहे. त्यात शेतीविषयक संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडीओ पद्धतीने शेतीपूरक मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती महाविस्तार ॲपच्या माध्यमातून मिळणार. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲपमधून बाजारभाव, हवामान अंदाज समजणार आहे. एका क्लिकवर चॅटबॉटवर शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची उत्तरे अचूक मिळणार आहेत.
advertisement
यात चॅटबॉट एक संगणकीय प्रणाली आहे. त्यात संवाद करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. चॅटबॉट्सचा उपयोग विविध सेवा देण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचतो. शेतकऱ्यांना सहज शेतीची माहिती मिळणार आहे. हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हाने उभी आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती दिली जाणार आहे. ॲपमध्ये हवामान अंदाज, पीक लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीकसल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती मिळणार आहे.
advertisement
ॲप सुरू कसे करावे?
मोबाईलमध्ये ॲप घेण्यासाठी फार्मर आयडी टाकून लॉगिन करता येते. तसेच फार्मर आयडी नसल्यास मोबाइल नंबर टाकूनही लॉगिन करता येते. ॲपच्या माध्यमातून ही सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळते.
महाविस्तार ॲपमध्ये पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंतचा सल्ला...!
खरिप पेरणीपासून हवामान अंदाज, पिकांना वेळोवेळी द्यावे लागणारे खताचे डोस, फवारणी, हवामान बदल, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीकसल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती ॲपवर मिळणार आहे. शेतीमाल विक्रीचा सल्लाही दिला जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahavistar App: शेतात काय पेरायचं, कधी विकायचं? शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप सांगणार संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement