CM एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता, कोण होणार मुख्यमंत्री? हालचालींना वेग
- Published by:Suraj
Last Updated:
Who will be next CM : महायुतीला बहुमत मिळालं असून मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप त्यांचा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीला बहुमत मिळालं असून मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप त्यांचा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी राज्यपालांकडे राजीनामा सोपवू शकतात. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
सोमवारी रात्री भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. पण तिथं त्यांची अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबईत येणार असल्याच्या चर्चा आहेत.
भाजपकडून मुख्यमंत्री शिंदे यांना भाजपचा मुख्यमंत्री होईल असं सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक उपमुख्यमंत्री असतील. भाजपच्या १३२ आमदारांसोबत इतर पक्षांचे आमदार एकत्र आले तर ते बहुमताचा जादुई आकडा गाठू शकतात. त्यामुळे सहकारी पक्षांवर त्यांना सत्तास्थापनेसाठी अवलंबून रहावं लागणार नाही.
advertisement
दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आग्रही असून यामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेच सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करतील. यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुन्हा दिल्लीला येऊ शकतात किंवा अमित शहा पक्षाचे निरीक्षक म्हणून मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतील असं म्हटलं जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 7:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता, कोण होणार मुख्यमंत्री? हालचालींना वेग


