सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फूटीनंतरची चुरशीची निवडणूक; कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत कोण मारणार बाजी?
- Published by:Devika Shinde
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत यंदा हाय व्होल्टेज राजकीय लढती पाहायला मिळणार आहेत. शिंदे गट-ठाकरे गट यांच्यात चुरशीच्या लढतींचे रंगतदार समीकरण.
सितराज परब - प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मालवणी भाषेचा गोडवा, दशावतार, मासेमारी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, त्याचबरोबर हा जिल्हा राजकारणाच्या रंगमंचावरही ओळखला जातो. राज्यात आणि देशाच्या पटलावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वेगळे स्थान आहे. जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत - कणकवली, कुडाळ, आणि सावंतवाडी, आणि यंदा तिन्ही ठिकाणी हाय व्होल्टेज राजकीय लढती होणार आहेत.
राजकीय ताकदीचा अंदाज
सिंधुदुर्गमधील विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे आणि राष्टवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप युतीमुळे मतदारांच्या मतदानाचा कल कोणत्या बाजूला झुकतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
कणकवली मतदारसंघ
नारायण राणे यांनी शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, परंतु नंतर त्यांनी काँग्रेस आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सुपुत्र नितेश राणे येथे निवडणुकीला उभे आहेत, तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संदेश पारकर आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
कुडाळ मतदारसंघ
या भागात जातीय समीकरणे ठळक आहेत, खासकरून मच्छीमार समाजाचा मोठा प्रभाव आहे. ठाकरे गटाचे वैभव नाईक येथे दोनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांच्या विरोधात आता शिंदे गटाचे निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या मतदारसंघात देखील चुरशीची लढत अपेक्षित आहे.
सावंतवाडी मतदारसंघ
गोव्याच्या सीमेलगत असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाचे दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली आणि भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत यंदा हाय व्होल्टेज राजकीय लढती पाहायला मिळणार आहेत. शिंदे गट-ठाकरे गट यांच्यात चुरशीच्या लढतींचे रंगतदार समीकरण.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2024 7:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फूटीनंतरची चुरशीची निवडणूक; कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत कोण मारणार बाजी?