advertisement

Eknath Khadse : राष्ट्रवादीचा राजीनामा, तरी नाथाभाऊ वेटिंगवर; खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला?

Last Updated:

एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं, पण त्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही, त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त का मिळत नाहीये? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचा राजीनामा, तरी नाथाभाऊ वेटिंगवर; खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला?
राष्ट्रवादीचा राजीनामा, तरी नाथाभाऊ वेटिंगवर; खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला?
जळगाव : एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं, पण त्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही, त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त का मिळत नाहीये? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपले सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले, यावेळी एकनाथ खडसेंनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत खुलासा केला आहे.
'मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी आलो. रक्षा खडसे माझी सून नाही तर मुलगी आहे, मात्र मी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो, अधिकाधिक मतांनी दोघी निवडून याव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे भाजपचा प्रचार करायला मोकळा आहे. रक्षा खडसेंचा उमेदवारी फॉर्म भरायला उपस्थित राहिलो नाही, कारण अजूनही माझा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. ', असं एकनाथ खडसे म्हणाले.
advertisement
महाराष्ट्र भाजपचं स्पष्टीकरण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'राज्यातल्या समितीला एकनाथ खडसेंबद्दल किंतू परंतू नाही, खडसेंबद्दलचा निर्णय केंद्रीय समिती करेल,' असं बावनकुळे म्हणाले.
दुसरीकडे गिरीश महाजनांनीही खडसेंच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं आहे. 'खडसे साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी मी फक्त पंतप्रधान, अमित शाह आणि नड्डा यांच्याशीच बोलतो खालच्यांशी कुणाशी बोलत नाही, असं सांगितलं आहे, त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही,' अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse : राष्ट्रवादीचा राजीनामा, तरी नाथाभाऊ वेटिंगवर; खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला?
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement