Voting ink: मतदानानंतर बोटावर शाई पुसली का जाते? निवडणूक आयोगाच्या वाघमारेंचं गंमतीशीर उत्तर

Last Updated:

निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. सगळ्या गोष्टींना निवडणूक आयोग जबाबदार नाही, काही जबाबदारी ही मतदारांची पण आहे

News18
News18
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी सगळीकडे मतदान सुरू आहे. पण, पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर शाई दाखवण्याचा ट्रेंड होता पण आता बोटाची शाई पुसली जात असल्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मुंबईमध्ये बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे बंधूंनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. अखेरीस निवडणूक आयोगालाही जाग आली असून शाई पुसली जात असल्याबद्दल खुलासा केला आहे. मार्कर पेन वापरले असल्याचं मान्य केलं आहे. या पुढे झेडपीच्या निवडणुकीत वापरणार नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला. पण, अजून कोणतीही कारवाई किंवा शाई बदलाबद्दल कोणतंही पाऊल उचललं नाही.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश  वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि बोटावर शाई पुसण्याचा प्रकार आणि दुबार मतदारावर भाष्य केलं.
"कोरस कंपनीचे मार्क वापरतोय. २०११ पासून मार्कर वापरले जात आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणूक ही १० वर्षांनंतर होत आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीत काय पद्धत आहे. अनेक ठिकाणी ४ वार्डमधून उमेदवार निवडून द्यायचे आहे. या मध्ये सुद्धा संभ्रम आहे. यासाठी आम्ही एक अॅनिमेशन व्हिडीओ तयार केला आहे. मतदारांना किती मत द्यायचं, कोणत्या मतप्रक्रियेचा कलर वेगळा आहे. काही मतदारांनी पाहिलं आहे त्यांचा गोंधळ उडाला आहे" अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली.
advertisement
"शाई पुसली जात आहे, हा संभ्रम पसरवला जातोय"
आज सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत मार्कर पेनमुळे लावलेली शाई पुसली जाात आहे, असा मोठ्या प्रमाणात संभ्रम पसरवला जात आहे. माझं सांगने आहे ही एक इंटिबेल इंक आहे, भारत निवडणूक आयोग जी इंक वापरतो तीच इंक इंडरेबल इंक वापरत आहे, तीच इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. हे मार्कर पेन २०११ पासून वापरले जात आहे. यामध्ये ही शाई पुसली जात नाही, विशेष करून एकदा लावल्यानंतर १२ ते १५ सेकंदात शाई ड्राय होते. मतदार हा तोपर्यंत मतदान केंद्रातच असतो. या शाईविषयी कुठल्या प्रकारचा संशय आणि व्हिडीओ बाहेर काढले जात आहे. हा संभ्रम पसरवला जात आहे, असा दावाच वाघमारेंनी केला.
advertisement
'दुबार मतदार आढळला तर कारवाई होईल'
"मतदान मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात त्याची ओळख पटवून देतात. ती ओळख पटवल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यांना मतदानाबद्दल काही आक्षेप असेल तर मतदान अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतो. एखदा मतदार जर पुन्हा मतदार करायला आला तर मतदान केंद्रावरील अधिकारी हे तपासतील जर आढळून आलं दुबार मतदार करण्यासाठी आला तर कारवाई केली जाईल" असंही त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
तसंच, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मतदारांचा टक्का चांगला आहे. मार्कर पेनचा अनुभव घेता, जिल्हा परिषद निवडणुकीला इंटेल इंक वापरणार आहोत. मतदानांचं प्रकार ३५ टक्के आहे. दोन टक्के ईव्हीएम खराब झाल्या आहेत .मागील १० वर्षांमध्ये एकही ईव्हीएम विकत घेतली नाही. त्याच त्या ईव्हीएम मशीन वापरत आहे. त्यामुळे २ टक्के ईव्हीएअ खराब होण्याच प्रमाण आहे, असंही वाघमारेंनी मान्य केलं.
advertisement
'निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय'
निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. सगळ्या गोष्टींना निवडणूक आयोग जबाबदार नाही, काही जबाबदारी ही मतदारांची पण आहे, काही जबाबदारी ही राजकीय पक्षांची पण आहे. काही जबाबदारी ही उमेदवारांची पण आहे, असं म्हणत वाघमारेंनी उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगावर कारवाई करण्याच्या विधानावर भाष्य केलं.
advertisement
"याद्या तपासण्याचं काम मतदारांचं"
"याद्या चेक करत असतानाही अनेक मतदारांचं नाव यादीत नव्हतं. मतदाराची यादी विधानसभेची आम्ही वार्ड नुसार स्प्लिट करत असतो. पोलीस स्टेशनच्या हद्दीनुसार बदलत असतो. प्रभागानुसार बदलली आहे. त्यामुळे मतदान केंद्र राहणारच नाही. लोक विधानसभेची यादी घेऊन जात आहे. आमचं एॅप आहे, पोर्टल आहे. मतदान केंद्रावर मतदाराचे नाव तपासणासाठी BLO बसलेले आहे, त्यांच्याकडून मतदार शोधत येतो. यात मतदाराची जबाबदारी आहे' असा दावाही वाघमारेंनी केला.
advertisement
संशयित मतदान केंद्रांवरील मतपेट्या तात्काळ सीलबंद
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ दरम्यान गंभीर अनियमितता उघडकीस आली असून प्रभाग क्रमांक २०० ते २०६ मध्ये दुबार मतदान झाल्याचा संशय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे व्यक्त केला आहे. परळ येथील भायवाडा मराठी उर्दू प्राथमिक शाळा संकुलात १०, ११ व १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदार ओळख व नियंत्रण यंत्रणा अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका प्रभागात मतदान केल्यानंतर इतर प्रभागांमध्येही मतदान झाल्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नसून, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संशयित मतदान केंद्रांवरील मतपेट्या तात्काळ सीलबंद करण्यात आल्या असून आज दुपारी ३ वाजता त्यांची छाननी करण्यात येणार आहे; मात्र मतदानानंतर उशिरा होणारी ही तपासणी निष्काळजीपणाचे द्योतक असल्याची टीका होत आहे.
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला असून गरज भासल्यास संबंधित प्रभागांतील मतदान रद्द करून फेरमतदान घ्यावे, अशी मागणी उमेदवारांकडून जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Voting ink: मतदानानंतर बोटावर शाई पुसली का जाते? निवडणूक आयोगाच्या वाघमारेंचं गंमतीशीर उत्तर
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement