लातूरमध्ये प्रेमाचा करुण अंत, मध्यरात्री कॉल करत होती तरुणी, BFने उचलला नाही फोन, नंतर घडलं भयंकर

Last Updated:

Latur Crime News: लातूर शहरातील म्हाडा कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास इथं एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे.

News18
News18
Latur Crime News: लातूर शहरातील म्हाडा कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास इथं एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला फोन करत होती. मात्र प्रियकराने फोन उचलला नाही. यानंतर अस्वस्थ झालेल्या तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवलं. सकाळी गर्लफ्रेंडच्या मृत्यूची बातमी समजताच तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वैष्णवी विनोद लादे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर नरेंद्र रामराव राठोड असे विष घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे पीएसआय मनीष आंधळे यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी निवृत्त शिक्षक रामराव राठोड यांचे म्हाडा कॉलनीत घर आहे. त्या घरात त्यांचा मुलगा नरेंद्र (२५) शिक्षणासाठी एकटाच राहतो. या घरापासून काही अंतरावर बारावीचे शिक्षण झालेली वैष्णवी लादे राहत होती.
advertisement
मृत वैष्णवी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका मॉलमध्ये कामाला होती. मागील काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. चार दिवसांपूर्वी नरेंद्र हा पुण्याला जॉब करण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो लातूरला परत आला. त्याने वैष्णवीच्या मॉलमध्ये जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु मॉलमधील तरुणांनी नरेंद्रसोबत वाद घालत त्याला मारहाण केली. या घटनेनंतर मध्यरात्री २ वाजता वैष्णवीने नरेंद्रला मेसेज आणि कॉल केले, परंतु नरेंद्रने तो मेसेज सकाळी ६ वाजता पाहिला. यानंतर त्याला थेट वैष्णवीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. नंतर नरेंद्रने उंदीर मारण्याचे औषध घेतले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे.
advertisement

'...तर कदाचित ती वाचली असती'

या घटनेची अधिक माहिती देताना प्रियकर नरेंद्र राठोडनं सांगितलं की, रात्री ११ वाजता जेवण झाले का? असा वैष्णवीचा मेसेज आला. त्यानंतर मी झोपी गेलो. मध्यरात्री २ वाजता तिचे दोन कॉल येऊन गेले. परंतु फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे मला समजले नाही. ते कॉल मी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पाहिले. नेहमी सकाळी १०.३० नंतर तिचा कॉल यायचा, परंतु मी कॉल केल्यावर माझा नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेला आढळला. त्यानंतर सकाळी ११ वाजता तिने आत्महत्या केल्याचे माझ्या मित्राकडून समजले. मी औसा रोडवरून विषाची बाटली खरेदी करून विष घेतले. रात्रीच तिचे कॉल मी उचलले असते तर कदाचित ती वाचली असती, असे उपचार घेणाऱ्या नरेंद्र राठोडने सांगितले.
advertisement
पण वैष्णवीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? मॉलमधील तरुणांनी नरेंद्रला मारहाण का केली? या प्रश्नांची उत्तरं अजून अनुत्तरित आहेत. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी अद्याप तक्रार दिलेली नाही, त्यामुळे त्यांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लातूरमध्ये प्रेमाचा करुण अंत, मध्यरात्री कॉल करत होती तरुणी, BFने उचलला नाही फोन, नंतर घडलं भयंकर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement