राणांकडून भाजपचा व्यवस्थित गेम, ठाकुरांचा भाजपसह राणांवर 'नेम'; यशोमतींच्या टीकेवर राणांचा पलटवार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राणा दाम्पत्यानं देखील पलटवार केल्यानं पुन्हा एकदा ठाकूर विरुद्ध राणा असा राजकीय सामना रंगल्याचं चित्र आहे.
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. भारतीय जनता पक्ष 45 जागांवरून थेट 25 जागांवर घसरला आहे. याच मुद्द्यावरुन आता काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांनी भाजपसह राणा दाम्पत्याला डिवचल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यानंतर आता राणा दाम्पत्यानं देखील पलटवार केल्यानं पुन्हा एकदा ठाकूर विरुद्ध राणा असा राजकीय सामना रंगल्याचं चित्र आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत सत्तेचं त्रागडं निर्माण झालंय. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं आता युती करूनच सत्ता स्थापन करण्याचा पर्याय भाजपसमोर आहे. अमरावती महापालिकेत एकूण 87 जागा होत्या. त्यामुळं सत्ता स्थापन करण्यासाठी 45चा आकडा गाठणं गरजेचं आहे. पक्षीय बलाबल पाहता, भाजपकडे 25 नगरसेवक आहेत. तर त्या खालोखाल काँग्रेसच्या 15 जागा आहेत . तर रवी राणांच्या युवा स्वाभिमानीनं देखील 15 जागा जिंकल्या आहे.
advertisement
असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमचे 12 नगरसेवक विजयी
असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 11 नगरसेवक आहेत. बहुजन समाज पक्षाचे 3 नगरसेवक विजयी झाले. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 3 नगरसेवक
आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक विजयी झाले आहेत. वंचितनंही अमरावतीत 1 जागा मिळवत खातं उघडलं.
5 नगरसेवकांची जुळवाजुळव
advertisement
कोणत्याच एका पक्षाला बहुमत नसल्यानं, युती आघाडीशिवाय अमरावती महापालिकेत सत्तेचं गणित जुळूच शकत नाहीय. अशा परिस्थिती 45 वरुन थेट 25 जागांवर घसरलेलेल्या भाजपला 15 नगरसेवक असलेल्या रवी राणांची मदत घ्यावी लागणार आहे. त्याचवेळी आणखी 5 नगरसेवकांची जुळवाजुळवही करावी लागणार आहे.
भाजपसह राणा दाम्पत्यांवर निशाणा
याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी राणांनी भाजपचा गेम केल्याचं टोला लगावत भाजपसह राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राणा दांपत्यानं देखील जोरदार पलटवार केला. माझ्या ननंद बाईला भाजपची जास्त चिंता आहे त्यांनी भाजपची चिंता करण्याची ऐवजी काँग्रेसची चिंता करावी असा पलटवार नवनीत राणांनी केला.
advertisement
नणंद-भावजयीचा राजकीय संघर्ष सुरू
अमरावतीत भाजप सत्तेचं गणित कसं जुळवतं? निवडणुकी दरम्यान ज्या राणांची युती तोडली, त्या राणांसोबत भाजप पुन्हा युती करतं की राष्ट्रवादीचा पर्याय निवडत इतरांनाही जवळ करतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण, महापालिका निकालानंतर अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा राणा विरुद्ध ठाकूर असा नणंद-भावजयीचा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं चिन्ह आहे, अशी चर्चा वर्तुळात रंगली आहे.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राणांकडून भाजपचा व्यवस्थित गेम, ठाकुरांचा भाजपसह राणांवर 'नेम'; यशोमतींच्या टीकेवर राणांचा पलटवार










