निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये अजितदादांना धक्का, बड्या नेत्याने घड्याळ हटवले, तडकाफडकी राजीनामा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Beed Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची गणिते जुळवित असताना बीडमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : अजित पवार यांच्या नेृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची गणिते जुळवित असताना बीडमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बीड विधानसभेचे प्रमुख डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित बिघडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचे वडील डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्याकडे 35 वर्ष बीड नगरपालिकेचे सत्ता होती. परंतु नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्याने सगळी गणिते बदलून गेली आहेत.
मला डावललं जातं होतं, सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला
स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे कारण सांगून त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. बीडमधील निवडणुकीच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही बदल झाला नसल्याचे सांगत पक्षातून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
advertisement
योगेश क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट, घड्याळ हटवले
मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी काम करत होतो. परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्यामुळे मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे. परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्या कडे सुपूर्द करत आहे. तरी पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारीच्या माध्यमातून मी पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार मानतो. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद…!
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
November 15, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये अजितदादांना धक्का, बड्या नेत्याने घड्याळ हटवले, तडकाफडकी राजीनामा


