Peshwai Pizza : पिझ्झा खायची मज्जाच मज्जा, पुण्यात चक्क मिळतोय 10 इंचाचा पेशवाई पिझ्झा, तब्बल 6 फ्लेवर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Peshwai Pizza : गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या पुरब सागरे यांनी हटके कल्पनेतून तयार केलेल्या पिझ्झाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पुणे : पिझ्झामध्ये नेहमीच काही ना काही प्रयोग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या मिस्टर पिझ्झा या ठिकाणी पारंपरिक पिझ्झाला एक वेगळी चव देत एक पेशवाई पिझ्झाची नवीन संकल्पना साकारण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या पुरब सागरे यांनी हटके कल्पनेतून तयार केलेल्या पिझ्झाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पेशवाई पिझ्झा हा 10 इंचाचा असून तो एकट्या व्यक्तीसाठी खाण्यासाठी खूप मोठा आहे. यामध्ये तब्बल 6 वेगवेगळे फ्लेवर असतात. पनीर मराठा, सुपर स्पायसी, माको सुप्रीम, व्हेज फार्म मराठा आणि सिम्पली डिलाईट हे काही प्रमुख फ्लेवर आहेत. पारंपरिक इटालियन पिझ्झाला मराठमोळा स्वाद देण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे ग्राहकांसाठी हा एक नवा अनुभव ठरतो आहे.
advertisement
मिस्टर पिझ्झामध्ये केवळ पेशवाई नव्हे तर एकूण 14 प्रकारचे विविध चवींचे पिझ्झा उपलब्ध आहेत. पास्ता पिझ्झा, चीज पिझ्झा, जैन पिझ्झा यांसारखे पर्याय देखील येथे चव घेता येतात. विशेष म्हणजे या सर्व पिझ्झांची किंमत अगदी 80 रुपये ते 249 रुपये दरम्यान आहे, जे खवय्यांसाठी चांगला पर्याय ठरतं आहेत.
advertisement
व्यवसाय सुरू करताना लोकांना नवनवीन फ्लेवरमध्ये पिझ्झाचा अनुभव देता यावा, असा उद्देश होता. त्या दृष्टिकोनातून विविध चवीचे प्रयोग केले आणि त्यातूनच पेशवाई पिझ्झाची कल्पना साकारली. पारंपरिक आणि स्थानिक पदार्थ एकत्रित करून हा तयार केला आहे. पिझ्झाला पुणेकर खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, असं पुरब सागरे यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 06, 2025 2:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Peshwai Pizza : पिझ्झा खायची मज्जाच मज्जा, पुण्यात चक्क मिळतोय 10 इंचाचा पेशवाई पिझ्झा, तब्बल 6 फ्लेवर, Video