agriculture : कमी वेळात व्हायचंय करोडपती, तर मग ही शेती करा, खूप जास्त मिळेल नफा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
या झाडाची खासियत म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याची लागवड खूप सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. यासाठी विशेष मातीची गरज नाही. चिकणमाती माती असो किंवा वालुकामय माती, प्रत्येक प्रकारच्या मातीत हे पीक घेतले जाते.
अंजू प्रजापति, प्रतिनिधी
रामपुर : भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. याठिकाणी आजही बरेचसे लोक कोणत्या ना कोणत्या पिकाची शेती करत आहेत. शेतीवर अनेकांचे आयुष्य अवलंबून आहे. तुम्हालाही शेतीच्या माध्यमातून चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्ही मलबार कडुलिंबाची शेती करू शकतात. या शेतीच्या माध्यमातून तुम्ही लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची कमाई करू शकतात.
advertisement
उत्तरप्रदेशातील रामपुर येथील एका शेतकऱ्याने मलबार कडुलिंबाची शेती करुन मोठा आर्थिक फायदा कमावला आहे. शेतकऱ्याने म्हटले की, ही शेती कमी वेळात तयार होते आणि अधिक नफा देते. रमेश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते रामपुरच्या ककरौआ गावातील रहिवासी आहे. त्यांनी सांगितले की, मलबार कडुलिंबाला मेलिया डबिया असेही म्हणतात. याची शेती दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. मलबार कडुलिंबाची शेती ही एक चांगली शेती आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
advertisement
5 हजार झाडे होणार तयार -
रामपुरमध्ये ही शेती फक्त रमेश कुमार करतात. तामिळनाडूच्या कोयंबतूर कृषी विज्ञान केंद्रातून त्यांनी 25 किलो बियाणे आणले. यामध्ये त्यांनी 5 किलो बियाण्यांची नर्सरी सुरू केली आहे. या माध्यमातून 5 हजार झाडे तयार होणार आहे. येत्या 1 ते 2 महिन्यात ही नर्सरी पूर्णपणे तयार होईल. यानतंर 4 एकर जमिनीत मलबार कडुलिंबाचे 5 हजार झाडे लावली जातील. 4 ते 5 वर्षात हे झाड तयार होते. मलबार कडुलिंबाचे लाकूड 8 ते 9 रुपये प्रति क्विंटल विकले जाते आणि एक झाड 4 ते 5 क्विंटलचे होते. यानुसार एका झाडापासून चार ते पाच हजार रुपयांचा नफा मिळतो.
advertisement

तुम्हालाही विकायचे आहेत जुने कपडे, तर या 4 website महत्त्वाच्या, घरी बसूनच कमवू शकतात पैसे
या झाडाची खासियत म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याची लागवड खूप सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. यासाठी विशेष मातीची गरज नाही. चिकणमाती माती असो किंवा वालुकामय माती, प्रत्येक प्रकारच्या मातीत हे पीक घेतले जाते. यामध्ये पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात महिन्यातून एकदा पाणी दिले जाते आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी देण्याची गरज नसते, असे ते म्हणाले.
advertisement
मलबार कडुलिंबाची लागवड करून शेतकऱ्यांना लवकर उत्पन्न मिळते. पॉपलरपेक्षा मलबार कडुलिंबाच्या लाकडाचे वजन जास्त असते आणि ते पाणीदेखील कमी वापरते. त्याचे लाकूड प्लायवूड बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाते. याशिवाय लाकडी माचिस बॉक्स, लाकडी पॅकिंग बॉक्स आणि अनेक प्रकारचे फर्निचर इ. वस्तू यापासून तयार केल्या जातात.
Location :
Rampur Maniharan,Saharanpur,Uttar Pradesh
First Published :
Mar 18, 2024 7:44 AM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
agriculture : कमी वेळात व्हायचंय करोडपती, तर मग ही शेती करा, खूप जास्त मिळेल नफा










