तुम्हालाही विकायचे आहेत जुने कपडे, तर या 4 website महत्त्वाच्या, घरी बसूनच कमवू शकतात पैसे
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील, ज्यांना नवीन नवीन कपडे घालण्याची आवड असते. त्यामुळे ते लोक नेहमी कपडे खरेदी करत राहतात. त्यामुळे काही कालावधीनंतर ते कपडे तसेच पडलेले राहतात. खरेदी केलेल्या अनेक कपड्यांचा वापरही होत नाही. त्यामुळे काही कपडे कालानंतर साईजमध्येही लहान मोठे होतात. मात्र, अशा काही वेबसाईट्स आहेत, ज्यावर तुम्ही तुमचे हे कपडे विकू शकतात. (अकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
Spoyl.com ही एक अशीच वेबसाइट आहे. या वेबसाइटवर तुम्ही तुमचे जुने कपडे अतिशय चांगल्या दरात विकू शकता. जर तुम्हाला तुमची ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि पुस्तके कुणासोबत विकायची असतील तर तुम्ही तीदेखील या वेबसाइटवर विकू शकता. तुम्ही येथे भावही ठरवू शकतात. या साइटवरून तुम्ही अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्यांचे कपडे देखील खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
Etashee हीसुद्धा एक अशीच वेबसाईट आहे. इथे तुम्ही तुमचे जुने कपडे वाजवी दरात विकून पैसे कमवू शकता. या वेबसाइटवर आधीपासूनच फॅशनप्रेमी ऑडियन्स असू शकतात. हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. कपडे खरेदी करू इच्छिणारे लोक या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांचे जुने कपडे विकू शकतात आणि त्या पैशातून नवीन कपडे किंवा इतर फॅशनच्या वस्तू खरेदी करू शकतात.










