मोबाईलचा वापर करावा तर असा, youtube वरुन शिकून आज तरुण करतोय लाखोंची कमाई

Last Updated:

अनेक जण मोबाईलचा योग्य वापर करावा, सोशल मीडियापासून दूर राहावे, असाही सल्ला देतात. मात्र, असे असताना एका व्यक्तीने मोबाईलचा योग्य वापर केला आहे. तसेच हा व्यक्ती आज लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे.

तरुण शेतकरी श्रीकांत
तरुण शेतकरी श्रीकांत
संजय यादव, प्रतिनिधी
बाराबंकी : सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. भारतातील मोठ्या प्रमाणातील तरुणाई दिवसातील 5 ते 7 तास मोबाईलवर असते, असेही संशोधनातून समोर आले आहे. असे असताना अनेक जण मोबाईलचा योग्य वापर करावा, सोशल मीडियापासून दूर राहावे, असाही सल्ला देतात. मात्र, असे असताना एका व्यक्तीने मोबाईलचा योग्य वापर केला आहे. तसेच हा व्यक्ती आज लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे.
advertisement
जिल्ह्यातील शेतकरी आता नवनवीन पद्धतीने शेती करत आहेत. तसेच कमी खर्चात चांगला नफा मिळवत आहेत. असाच एक तरुण शेतकरी आहे, जे स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. श्रीकांत असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील आहेत.
पूर्वी ते एक बिघामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करायचे. त्यातून चांगला नफा मिळविल्यानंतर आज ते एक एकरात स्ट्रॉबेरीची लागवड करत आहोत. एक एकर स्ट्रॉबेरी लागवडीत दोन ते तीन लाख रुपये गुंतवून शेतकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांचा नफा कमावत आहेत. त्यांची शेती पाहून गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्यासारखी शेती करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
तरुण शेतकरी श्रीकांत यांनी सांगितले की, आधी मी भातशेती, गव्हाची शेती करायचो. मात्र, त्यामध्ये फायदा होत नव्हता. यामुळे आम्ही टेंशनमध्ये होतो. मग यूट्यूबवर स्ट्रॉबेरीची शेती कशी करावी, याची माहिती मी मिळवली. त्यानंतर एक बिघापासून स्ट्रॉबेरीची शेती करायला सुरुवात केली. आज आम्ही एक एकरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करत आहोत.
मावशीच्या गावी गेला अन् तरुणीच्या प्रेमात पडला, पण लग्नासाठी आईने दिला नकार, पुढे काय घडलं?
या शेतीमध्ये जास्त फायदा यासाठी होतो, कारण आधी शेत तयार केले जाते. मग ठिबक पसरवली जाते. त्यानंतर खत, फॉइल, कीटकनाशके, औषधे, मजूर इत्यादींचा जास्त खर्च येतो. यानुसार एका एकरावर दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो आणि एक एकरावर तीन ते साडेतीन लाख रुपये सहज नफा होतो. इतर शेतीच्या तुलनेत त्याची लागवड चांगली फायदेशीर शेती आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
तर अशाप्रकारे यूट्यूबच्या मदतीने त्यांना स्ट्रॉबेरीची शेती कशी करावी याची माहिती मिळाली. आज त्यांचा लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची लागवड करा आणि चांगला नफा मिळवा, असा सल्लाही त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मोबाईलचा वापर करावा तर असा, youtube वरुन शिकून आज तरुण करतोय लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement