'या' कंपनीत पैसे लावणाऱ्यांनी 5 दिवसात कमावले 54 हजार कोटी, पाहा टॉप-10 कंपन्यांची लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Top-10 Firms Market Cap: शेअर बाजारातील वाढीमुळे सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मार्केट व्हॅल्यू गेल्या आठवड्यात वाढले. गेल्या आठवड्यात भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांनी सर्वाधिक कमाई केली.
नवी दिल्ली : गेल्या आठवडा शेअर बाजारासाठी चांगला आठवडा ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने नवीन विक्रमी उच्चांक गाठला असताना, सेन्सेक्सच्या टॉप-10 व्हॅल्यूएबल कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. यामध्ये एकत्रितपणे 2,01,552.69 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या काळात भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला आणि अवघ्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीत 54 हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.
गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 1,707.01 अंकांनी किंवा 2.10 टक्क्यांनी वधारला. गुरुवारी (12 सप्टेंबर) सेन्सेक्सने 83,116.19 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली.
या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात पैसे कमावले
न्यूज एजेन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात भारती एअरटेलचे मार्केट व्हॅल्यूएशन 54,282.62 कोटी रुपयांनी वाढून 9,30,490.20 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे मार्केट कॅप 29,662.44 कोटी रुपयांनी वाढून 8,80,867.09 कोटी रुपये झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजार भांडवल 23,427.12 कोटी रुपयांनी वाढून 16,36,189.63 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 22,438.6 कोटी रुपयांनी वाढून 6,89,358.33 कोटी रुपये आणि HDFC बँकेचे बाजारमूल्य 22,093.99 कोटी रुपयांनी वाढून 12,70,035.77 कोटी रुपयांवर पोहोचले.
advertisement
इन्फोसिसचे मार्केट कॅप 17,480.49 कोटी रुपयांनी वाढून 8,07,299.55 कोटी रुपयांवर आणि ITC चे 15,194.17 कोटींनी रुपयांनी वाढून 6,42,531.82 कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हॅल्यूएशन 9,878.19 कोटी रुपयांनी वाढून 19,92,160.61 कोटी रुपये झाले. SBI चे मार्केट कॅप 7,095.07 कोटी रुपयांनी वाढून 7,05,535.20 कोटी रुपये झाले.
गेल्या आठवड्यात LIC च्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे बाजार भांडवल 3,004.38 कोटी रुपयांनी घसरून 6,54,004.76 कोटी रुपयांवर आले आहे.
advertisement
टॉप-10 कंपन्यांची लिस्ट
टॉप-10 सर्वात व्हॅल्यूएबल कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, एलआयसी आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.
advertisement
शेअर बाजार म्हणजे काय?
view commentsशेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हे ठिकाण आहे जिथे सार्वजनिकरित्या लिस्टेड कंपनीच्या शेअर्सची खरेदी, विक्री आणि व्यापार होतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे. भारतात, सेबी सिक्युरिटीज आणि कमोडिटी मार्केटला रेग्युलेट करण्यासाठी काम करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2024 5:05 PM IST
मराठी बातम्या/मनी/
'या' कंपनीत पैसे लावणाऱ्यांनी 5 दिवसात कमावले 54 हजार कोटी, पाहा टॉप-10 कंपन्यांची लिस्ट


