20 हजार रुपयांचा खर्च अन् लाखोंची कमाई, हा व्यवसाय कराल तर नफ्यात राहाल
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
महिन्याचा एक पगार या बिजनेसमध्ये गुंतवला तर कराल लाखोंची कमाई, आयुष्यभर डोक्याला टेन्शन नाही
मुंबई : आजच्या काळात नोकरीच्या कमाईच्या जोरावर घर चालवणं थोडं कठीण होऊन बसलं आहे. अशा स्थितीत नोकरीशिवाय साईड बिझनेस करून सहज घर चालवता येऊ शकतं. तथापि, बरेच लोक व्यवसायात अधिक जोखीम घेतात. अशा परिस्थितीत लोक व्यवसाय करणं टाळू लागतात. पण हे सत्य आहे की नियोजनबद्ध पद्धतीने जोखीम पत्करून व्यवसाय केला तर त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. अशा परिस्थितीत आम्ही अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत जो 20 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू केला जाऊ शकतो.
खरं तर, आपण गवती चहा अर्थात लेमन ग्रास लागवडीबद्दल बोलत आहोत. हा व्यवसाय 20 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू करता येतो आणि योग्य पद्धतीने याची शेती करून लाखो रुपये कमवू शकतो.
एक हेक्टर जमिनीवर गवती चहाची लागवड करून चार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवता येते. एकेकाळी गवती चहाच्या लागवडीबाबत भारत खूप मागे होता. पण आता भारताने यात बरीच प्रगती केली आहे. भारत आता गवती चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
advertisement
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की गवती चहापासून बनवलेल्या तेलाला खूप मागणी आहे. या शिवाय अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, साबण आणि औषधं तयार करण्यासाठीदेखील गवती चहाचा वापर केला जातो. कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा गवती चहाची लागवड करता येते.
एक हेक्टर क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर यातून 12 ते 13 टन गवती चहाचं उत्पादन मिळतं. पहिली कापणी सोडून दुसऱ्या कापणीचा विचार केला तर सुमारे पाच पट पीक काढता येतं. याचाच अर्थ वर्षभरात सुमारे 60 ते 65 टन गवती चहाचं उत्पादन हाती येतं. त्याचवेळी एक टन गवती चहापासून सुमारे पाच लिटर तेल निघतं. अशाप्रकारे एका वर्षात सुमारे 300 ते 325 लिटर तेल मिळतं. बाजारात प्रतिलिटर तेलाचा दर 1200 ते 1500 रुपये आहे. या स्थितीत चार ते पाच लाख रुपयांची कमाई करणं सोपं आहे.
advertisement
गवती चहा पिकाला किंवा त्याच्या लागवडीकरिता जास्त पाणी लागत नाही. याला किड लागत नाही तसेच भटकी जनावरे देखील या पिकाचे नुकसान करत नाही. त्यामुळे ही महत्त्वाची जोखीम आपोआप दूर राहते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2023 10:23 AM IST








