Business Success: एका गृहिणीची उद्योग भरारी, महिन्याला लाखाचे बंडल घरी, पाहा काय केलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Business Success: महिलांची मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर या व्यवसायात त्यांनाही नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. संभाजनगरमधील एका गृहिणीने हेच दाखवून दिलंय.
छत्रपती संभाजीनगर: कष्ट आणि मेहनतीची तयारी असेल तर परिस्थिती कधीही बदलू शकते. छत्रपती संभाजीनगरमधील एका महिलेने आपल्या कर्तृत्वाने हेच दाखवून दिले आहे. घरातूनच सुरू केलेल्या गृहउद्योगाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे. त्यामुळे मुकुंदवाडी येथील संगीता छाने या मसाला उद्योगातून महिन्याला लाखभर रुपयांची कमाई करत आहेत. त्यांचीच यशोगाथा लोकल१८ च्या माध्यमातून जाणून घेऊ.
उद्योजिका संगीता छाने मुकुंदवाडी येथे मसाले तयार करणे आणि त्या मसाल्यांची विक्री करण्याचे काम करत आहेत. एकेकाळी मसाले तयार करण्याच्या एका मशिनरीपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज महिन्याकाठी लाखोंची उलाढाल करतो. त्यांच्या 'कल्पतरू' मसाला केंद्रात गरम मसाला, कोल्हापुरी मसाला, मटण मसाला अशा विविध प्रकारचे घरगुती आणि हॉटेल व्यवसायासाठी लागणारे मसाले उपलब्ध आहेत, तसेच मराठवाड्यातून त्यांच्या मसाल्याला ग्राहकांची मागणी आहे.
advertisement
संगीता छाने यांनी 17 वर्षांपूर्वी सुरू केले. सुरुवातीला एका छोट्या दुकानापासून सुरुवात केली होती. त्यांच्याकडे विविध प्रकारचे मसाले मिळतात. तसेच हळद पावडर, जिरे अशा विविध घरगुती लागणारे पदार्थ त्या स्वतः बनवतात आणि त्याची विक्री देखील करतात. यातून चांगला नफा देखील मिळत असल्याचे संगीता सांगतात.
advertisement
छाने यांचा मटन मसाला, घराघरात पोहोचला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मेहनतीला आणि गुणवत्तेला नेहमीच यश मिळते, हेच त्यांच्या मसाल्यांच्या मागणीवरून दिसून येते. छाने कुटुंबीयांनी केवळ एक व्यवसाय उभा केला नाही, तर अनेक महिलांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
महिलांची मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर या व्यवसायात त्यांनाही नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. हे यश केवळ एका व्यक्तीचे नाही, तर त्यामागे असलेला खंबीर पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा आहे. छाने यांच्या यशात त्यांचे पती प्रमोद छाने आणि सासू यांचाही मोलाचा वाटा आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 07, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Success: एका गृहिणीची उद्योग भरारी, महिन्याला लाखाचे बंडल घरी, पाहा काय केलं?